डेबिट-क्रेडिट कार्ड हॅक झाल्यास त्वरित करा हे काम

लोकांनी जसजसे डिजिटल व्यवहार करण्यास सुरूवात केली आहे, तसतसे ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. डेबिट-क्रेडिट कार्ड हॅक होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. हॅकर्स माहितीचा चुकीचा वापर करून लाखो रुपयांची फसवणूक करतात. ऑनलाईन फसवणूक झाल्यास, तुम्ही त्वरित पावले उचलल्यास मोठे नुकसान होण्यापासून वाचू शकता.

बँकेला त्वरित माहिती –

जर तुमच्या कार्डमधून तुम्हाला न सांगता पैसे काढले गेले असतील तर यासंबंधी माहिती त्वरित बँकेला द्या. डेबिट-क्रेडिट कार्डला त्वरित ब्लॉक करा. बँकेच्या कस्टमअर केअरला कॉल करून तुम्ही कार्ड क्लोन झाल्याची माहिती देऊ शकता. जेणेकरून, बँक तुमच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करेल.

कार्डला करा ब्लॉक –

डेबिट-क्रेडिट कार्डमधून अवैध रक्कम काढल्यास त्वरित कार्डला ब्लॉक करा. यामुळे तुमचे काही पैसे वाचतील. याशिवाय तुम्ही तुमचे पैसे दुसऱ्या बँकेच्या खात्यात ट्रांसफर करू शकता.

बँकेला ईमेल  –

कार्ड ब्लॉक केल्यानंतर अवैध रक्कम काढल्याची माहिती ई-मेलद्वारे बँकेला द्या. या ईमेलमध्ये रक्कम काढल्याचे स्टेटमेंट अथवा मेसेजचा स्क्रीनशॉट जोडावा लागेल.

नुकसान भरपाईसाठी अर्ज –

तुमच्या खात्यातून न सांगता पैसे काढले गेल्यास, तुम्ही बँकेत लिखित स्वरूपात भरपाईसाठी अर्ज करू शकता. मात्र नुकसान भरपाईसाठी तुम्हाला 3 दिवसात अर्ज करावा लागेल. अन्यथा या प्रक्रियेस पुर्ण होण्यास 120 दिवस लागतात.

Leave a Comment