कोरोना : स्पेनमधील नागरिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी दररोज करत आहेत हे काम

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे 11,826 प्रकरण स्पेनमध्ये समोर आले आहेत. यातील 533 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील लोकांनी स्वतःला घरात बंद करून घेतले असून, स्पेनमध्ये देखील अनेक शहरांना लॉक डाउन करण्यात आले आहे.

Image Credited – Amarujala

याच पार्श्वभुमीवर स्पेनमधील नागरिक एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत व एकात्मता दाखवत आहे. मॅड्रिडसह अनेक शहरांमध्ये रात्रीच्या 8 वाजताच लोक घराची बाल्कनी, जिना आणि लॉनमध्ये येऊन टाळ्या, शिट्टी आणि भांडी वाजवून   या महामारीशी लढण्याचा संदेश देत आहेत.

Image Credited – Amarujala

या परिस्थितीमध्ये देखील लोक आत्मविश्वास, संतूलन कायम ठेवण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. काही तरूण ऑनलाईन झुंबा, योग, डान्स क्लासेसशी जोडले गेले आहेत. नागरिक शासन आणि डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञता दाखवत आहे.

Leave a Comment