कोरोना : ‘क्वारंटाईन’ शब्दाचा इतिहास आणि उत्पत्ती

कोरोना व्हायरसच्या महामारीने जगभरात थैमान घातले असून, भारतात देखील 150 पेक्षा अधिक जणांना याची लागण झालेली आहे. या दरम्यान क्वारंटाईन हा शब्द वारंवार वाचायला, ऐकायला मिळत आहे. हा शब्द काय आहे व याचा इतिहास काय आहे ? याविषयी जाणून घेऊया.

सर्वात प्रथम क्वारंटाईन शब्दाचा वापर 17व्या शतकात करण्यात आला होता. हा शब्द लॅटिन भाषेतील क्वाड्राजिंडा आणि इटलियनमधील क्वारांटा शब्द मिळून बनला आहे. या दोन्ही शब्दांचा अर्थ 40 होतो.

14 व्या शतकात यूरोपमध्ये गिल्टी प्लेग (ब्लॅक डेथ) नावाचा आजार पसरला होता. सन 1343 मध्ये या आजाराने यूरोपच्या एक तृतियांश जनतेला ग्रासले होते. रागूसाच्या अधिकाऱ्यांनी (डबरोव्हनिक, क्रोएशिया) ट्रेंटिनो लागू करण्यासाठी कायदा पास केला. या अंतर्गत प्लेग प्रभावित भागातून येणाऱ्या जहाजांना 30 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. कोणालाही जहाजेवर जाण्याची परवानगी नव्हती.

14 व्या शतकात आयसोलेशनचा कालावधी 30 दिवसांवरून 40 दिवस करण्यात आला. नंतर ट्रेंटिनोचे नाव बदलून क्वारिंटिनो झाले व जे आता क्वारंटाईन नावाने ओळखले जाते. 40 आकड्याविषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. बायबलच्या अनेक घटना 40 नंबरवर लिहिलेल्या आहेत.

गिल्टी प्लेगच्या वेळी क्वारंटाईन शब्द प्रचलित झाला. मात्र या आधी देखील लोकांना आजारापासून लांब ठेवण्यासाठी प्रक्रिया चालवली जाते. प्लेग आणि कुष्ठरोगींना वेगळे ठेवण्यासाठी हॉस्पिटल बनवले जात असे, ज्यांना लाजीरँटो म्हटले जाते.

वर्ष 1878 मध्ये अमेरिकन काँग्रेसने नॅशनल क्वारंटाईन कायदा देखील पास केला. वर्ष 1921 मध्ये क्वारंटाईन सिस्टम पुर्णपणे राष्ट्रीयकृत झाली.

Leave a Comment