मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पडेल महागात


मुंबई : कोरोना व्हायरसची राज्यातील प्रकरणे झपाट्याने वाढत असून पुण्यात बुधवारी नवीन कोरोनाग्रस्त सापडल्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या आतापर्यंत 42 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत अनेक कठोर पावले उचलली आहेत. मुंबईत मंदिरापासून ते थिएटर, मॉल, पब, शाळा, क़ॉलेज अशा सगळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेकडून आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल. त्यासाठी रस्त्यांवर देखरेख करण्यासाठी मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्रात मंगळवारी एका 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या माणसाची पत्नीही कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले आहे. महाराष्ट्रातील या मृत्यूनंतर भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितले की, राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये सुट्टी देण्यात आली नाही. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Leave a Comment