कोरोना : 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार मायक्रोसॉफ्टचे सर्व स्टोर्स

कोरोना व्हायरसचा फटका दिग्गज टेक कंपन्यांना देखील बसला आहे. ट्विटरनंतर आता मायक्रोसॉफ्टने आपले जगभरातील स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवत सूचना दिली असून, ट्विटवर देखील या संदर्भात माहिती दिली.

कंपनीने स्पष्ट केले आहे की स्टोर्स बंद ठेवले असले तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळत राहील. केवळ अमेरिकेतच मायक्रोसॉफ्टचे 70 पेक्षा अधिक स्टोर्स आहेत.

मायक्रोसॉफ्टने ई-मेलमध्ये लिहिले की, कोरोना व्हायरसमुळे सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्याला लक्षात घेऊन स्टोर्स बंद करत आहोत. या काळात ज्या योग्य पद्धतीने तुमची सेवा करू शकतो, त्याद्वारे प्रयत्न करू. कंपनीचे सर्व स्टोर्स 17 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत बंद असतील. मात्र ग्राहकांना ऑनलाईन सर्व्हिस मिळेल.

याआधी अ‍ॅपलने देखील आपले सर्व स्टोर्स 27 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे.

Leave a Comment