कोरोना : Work From Home साठी हे आहेत सर्वोत्तम डाटा प्लॅन

कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. घरून काम करण्यासाठी लॅपटॉप आणि इंटरनेटची आवश्यकता आहे. घरून काम करण्यासाठी तुमच्याकडे पर्याप्त मात्रेत इंटरनेट डाटा असणे आवश्यक आहे. असेच काही सर्वोत्तम डाटा प्लॅन जाणून घेऊया.

जिओ (599 रुपये) – 

यूजर्सला या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डाटा आणि 100 एसएमएस मिळतात. सोबतच जिओ टू जिओ मोफत कॉलिंग आणि अन्य नेटवर्कसाठी 3 हजार मिनिटे मिळतात. या प्लॅनचा कालावधी 84 दिवस आहे.

जिओ (444 रुपये) –

या प्लॅनमध्ये देखील जिओ युजर्सला दररोज 2 जीबी डाटा आणि 100 एसएमएसची सुविधा मिळेल. सोबतच युजर्सला जिओ टू जिओ अनलिमिडेट कॉलिंग व अन्य नेटवर्कसाठी 2 हजार मिनिट मिळतील. या प्लॅनची वैधता 56 दिवस आहे.

एअरटेल (449 रुपये) –

या प्लॅनचा कालावधी 56 दिवस असून, यामध्ये एअरटेल युजर्सला दररोज 2 जीबी डाटा आणि 100 एसएमएसची सुविधा मिळेल. युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंग करू शकतात.

व्होडाफोन-आयडिया (399 रुपये) –

या प्लॅनचा कालावधी 28 दिवस आहे. यामध्ये युजर्सला दररोज 3 जीबी डाटा आणि 100 एसएमएस मिळतील. सोबतच युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंग करू शकता.

व्होडाफोन- आयडिया (699 रुपये) –

युजर्सला या प्लॅनमध्ये 2 जीबी डाटा आणि 100 एसएमएसची सुविधा मिळते. सोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा मिळेल. या प्लॅनचा कालावधी 84 दिवसांचा आहे. या सर्व प्लॅन्समध्ये प्रिमियम स्बस्क्रिप्शन मिळेल.

Leave a Comment