गर्दी टाळण्यासाठी ‘ही’ बँक देणार घरबसल्या सेवा


मुंबई – देशभराला सध्या कोरोनाने आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन तसेच डॉक्टरांकडून वारंवार गर्दीत जाणे टाळा असा सल्ला दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय बँकेच्या 500 हून अधिक सेवा या आता घरबसल्या मिळणार आहेत. हे सर्वकाही मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकींगच्या माध्यमातून शक्य असून त्यासाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नसल्याचे बँकेने म्हटले आहे.

ICICI Stack ही सुविधा बँकेने सुरू केली आहे. त्यानुसार घरीच ग्राहकांना बँकेच्या सोयी सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या सेवांमध्ये नवीन बचत खाते आणि चालू खाते सुरू करण्याच्या सेवांचा समावेश आहे. तसे झटपट कर्ज, झटपट क्रेडिट कार्ड, गृह कर्ज, वाहन कर्जच, ओव्हर ड्राफ्ट, व्यवसायासाठीच्या कर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकता.

वरील सेवांसाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर बँकेचा प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन तुम्हाला या सेवा देईल. तुम्हाला त्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. तसेच पैशांचा व्यवहार तुम्ही डिजिटल व्यवहारही करू शकता. त्यात UPI, भारत बिल पेमेंट यांचा वापर करू शकता. या सेवांसह विमासेवाही डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहे. तसेच फ़िक्स डीपॉजिट, RD, SIP, PPF, NPS Mutual fund सारख्या गुंतवणुकीच्या सेवांचा लाभही तुम्ही घरबसल्या घेऊ शकता.

Leave a Comment