BS-6 इंजिनची दुचाकी असल्यास करू नका या चुका

1 एप्रिलपासून बीएस-4 इंजिनच्या गाड्यांची विक्री बंद करून बीएस-6 मानक इंजिन असणाऱ्या गाड्यांची विक्री सुरू होईल. या दोन्ही इंजिनमध्ये सर्वात मोठा फरक कॅब्युरेटरचा आहे. नवीन इंजिनमध्ये फ्यूल इंजेक्शन सिस्टम देण्यात आलेले आहे.

जर तुमच्याकडे बीएस-6 इंजिन असलेल्या बाईक अथवा स्कूटर असल्यास थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण अद्याप बीएस6 गाड्यांच्या सर्व्हिस सेंटर्सची कमतरता आहे. तसेच मॅकेनिक देखील प्रशिक्षित नाही.

Image Credited – Amarujala

फ्यूल आणि टँक –

फ्यूल आणि टँकची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. फ्यूल टँकमध्ये गंज लागू नये व धूळ-माती आत जाता कामा नये. चुकीने पाणी अथवा इतर गोष्ट इंधन टँकमध्ये गेली तर फ्यूल इंजेक्टर्स काम करणे बंद करेल. मात्र ही समस्या कॅब्यूरेटरसोबत होत नाही. धूळ-मातीचे कण फ्यूल इंजेक्टर्सला खराब करतात. बनावट इंधन टाकू नये. कारण हे पार्ट्स वॉरंटीमध्ये येत नाहीत व त्यांना बदलण्यासाठी मोठा खर्च येतो.

Image Credited – Amarujala

फ्यूल इंजेक्टर्स –

फ्यूल इंजेक्शन सिस्टममध्ये अनेक फ्यूल इंजेक्टर्स असतात. त्यांना वेळोवेळी अधिकृत सर्व्हिस सेंटरवर साफ केले पाहिजे. या इंजेक्टर्सला वेळावेळी सर्व्हिस करणे गरजेचे आहे. जेणेकरून बाईकची वॉरंटी कायम राहते. सोबतच इंजिन देखील व्यवस्थित राहते.

Image Credited – Amarujala

कूलेंट –

जर तुमच्या बाईकमध्ये कुलेंट टाकले जात असेल तर त्याचा स्तर कायम राहिल व खराब होणार नाही, याची विशेष काळजी घ्या. स्कूटरमध्ये कूलेंट टाकले जात नाही. वेळावेळी कूलेंट बदलावे. गाडीच्या कंसोल पॅनेलवर बनवलेल्या इंडीकेटर्स लाइट्सवर लक्ष द्यावे. चालवताना इंस्ट्रूमेंट कंसोलमध्ये कमी कूलेंट दिसल्यास, त्यात तुम्ही पाणी देखील टाकू शकता.

Image Credited – Amarujala

इंजिन ऑइल –

गाडीतील इंजिनल ऑईलचे प्रमाणे वेळावेळी तपासावे. ऑईल काळे पडले असेल, तर त्वरित बदलावे. ऑइल कोणत्या ग्रेडचे असावे याची माहिती देखील सर्व्हिस मॅन्युअलमध्ये असते. ऑइल बदलताना ऑइल फिल्टरला बदलणे देखील आवश्यक आहे.

Image Credited – bikesmedia

एअर फिल्टर –

अनेक दुचाकी वाहनांमध्ये तुम्ही स्वतः एअर फिल्टर तपासू शकता. सर्वसाधारणपणे 40 हजार किमीवर एअर फिल्टर बदलणे आवश्यक आहे. इंजिनपर्यंत चांगली हवा पोहचण्यासाठी एअर फिल्टर आवश्यक आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास गाडी कमी मायलेज देते.

Image Credited – Amarujala

टायर प्रेशर –

वाहनांच्या टायरमध्ये हवेचा दाब योग्य असणे गरजेचे आहे. टायर प्रेशर योग्य असल्यास रस्त्याला गाडी चिटकून चालते. यामुळे मायलेज आणि परफॉर्मेंसवर देखील परिणाम होतो. ब्रेकिंग सिस्टम देखील व्यवस्थित काम करते. गाडीचे हँडलिंग आणि रायडिंग क्वॉलिटी थेट टायरच्या प्रेशरवर अवलंबून असते.

Leave a Comment