आजही कायम आहे भारतातील या चमत्कारी मंदिरांचे रहस्य

भारतात एकापेक्षा एक भव्य आणि सुंदर मंदिर आहेत. या मंदिरांना पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. भारतात अनेक चमत्कारी आणि रहस्यमयी मंदिर आहेत, ज्याचे रहस्य आजही लोकांना माहित नाही. अशा काही मंदिरांविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यात मां दुर्गाला समर्पित एक मंदिर आहे. ज्याला ज्वाली जी मंदिर अथवा ज्वालामुखी मंदिर नावाने देखील ओखळले जाते. या मंदिराच्या एका केंद्रात एक दिवा जळतो. या दिव्याबाबत सांगितले जाते की, हा दिवा अनादी काळापासून पेटलेला असून नेहमी जळतच राहतो. या ज्योतीमधून निळा प्रकाश निघतो, हे देखील एक रहस्यच आहे.

Image Credited – Amarujala

कर्नाटकच्या हम्पी येथील विरुपाक्ष मंदिर हे देखील एक रहस्य आहे. सांगण्यात येते की या मंदिरामध्ये काही असे स्तंभ आहेत, ज्यातून संगीत निघते. त्यांना म्यूजिकल पिलर्स म्हटले जाते. या स्तंभाबाबत सांगण्यात येते की, यातून संगीत कसे निघते हे जाणून घेण्यासाठी इंग्रजांनी स्तंभाना तोडले होते. मात्र संगीत वाजण्यासारखे आत काहीच नव्हते.

Image Credited – Amarujala

कर्नाटकपासून जवळपास 55 किमी लांब शिवगंगे मंदिर एका लहानशा डोंगरावर आहे. हा पुर्ण डोंगर शिवलिंगसारखा दिसतो. या मंदिराबद्दल असे म्हणतात की, येथे असलेल्या शिवलिंगवर तूप चढवल्यावर ते गूढपणे लोणीमध्ये रूपांतरित होते.

Image Credited – Amarujala

आंध्र प्रदेशमधील लेपाक्षी मंदिर वास्तूशिल्पचा एक चमत्कार आहे. मंदिर परिसरात एक लटकणारा स्तंभ आहे, जो जमिनीला स्पर्श करत नाही. याशिवाय येतील एक पदचिन्ह सीता मातेचे असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे हे पदचिन्ह नेहमी ओले असते. येथे पाणी कसे येते ? हे एक रहस्यच आहे.

Image Credited – Amarujala

कर्नाटकच्या हसन येथील हसनंबा मंदिर देखील रहस्यांनी भरलेले आहे. हे मंदिर वर्षातून केवळ एक आठवड्यांसाठी दिवाळीच्या निमित्ताने उघडे असते. सांगण्यात येते की मंदिराचे दरवाजे बंद करण्यापुर्वी येथे ज्योत लावली जाते व एक वर्षांनी दरवाजा उघडल्या नंतर देखील ज्योत पेटलेलीच असते. याशिवाय चढवण्यात आलेले फुल एक वर्षांनंतर देखील ताजे असतात.

Leave a Comment