कोणते इंजिन ऑइल तुमच्या गाडीसाठी आहे चांगले ?

कोणत्याही गाडीच्या इंजिनसाठी इंजिन ऑइल महत्त्वाचे असते. हे ऑइल इंजिनचे वय वाढवते. याशिवाय कोणत्याही तापमानात इंजिनच्या पार्ट्सना लुब्रिकेशनद्वारे स्मूथ बनवतात. यामुळे इंजिनच्या वेगवेळ्या भागात घर्षण कमी होते. इंजिन ऑइल वाहनाच्या इंजिनचे तापमान कमी करणे आणि ठंड ठेवण्यास मदत करते. ऑइल इंजिनमधील कार्बन आणि घाण देखील स्वच्छ करते.

इंजिन ऑइल कसे निवडावे ?

वाहनाच्या मॉडेलनुसार इंजिन ऑइलची निवड करावी. इंजिनचे वय, कामगिरी आणि त्याची सुरक्षा इंजिन ऑइलवर अवलंबून असते. इंजिनची क्षमता पाहून इंजियन ऑइल निश्चित होते. पेट्रोल आणि डिझेल इंजिनसाठी वेगवेगळे इंजिन ऑइल असते. कारचे मॅन्युअल वाचावे व ऑटोमोबाईल कंपनीने जे ऑइल सुचवले आहे, तेच निवडावे.

ऑइलमधील चिकटपणा –

इंजिन ऑइलचा चिकटपणा महत्त्वचा असतो. इंजिनच्या अधिक तापमानामुळे ऑइलचा चिकटपणा कमी होतो. जळल्याने देखील इंजिन ऑइल कमी होत जाते. सोबतच इंजिनमधील कंपार्टमेंटमधील घर्षणाने ऑइल खराब देखील होते. त्यामुळे ऑइलमधील चिकटपणा तपासावा.

पेट्रोल – पेट्रोल इंजिनसाठी वेगळे ऑइल –

गाडी पेट्रोल, डिझेल अथवा सीएनजीवर चालते, त्यानुसारच इंजिन ऑइल ठरते. कंपन्या पेट्रोल इंजिन गाड्यांसाठी W5-30 ऑइल वापरण्याचा सल्ला देतात.

डिझेल इंजिनचे कंबशन सिस्टम वेगळी असते. डिझेल इंजिनमध्ये जास्त कार्बन जमा होते. म्हणून यासाटी W15-40 पेक्षा अधिकचे ऑइल वापरण्याचा सल्ला दिला जातो.

Leave a Comment