कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी गाडीच्या या पार्ट्सला ठेवा स्वच्छ

दररोज वापरणाऱ्या वस्तूंद्वारे देखील कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल, गाडी या गोष्टींची सफाई करणे गरजेचे आहे. तुमची कार देखील व्हायरसची वाहक असू शकते. रस्त्यावरील धुळ-कण गाडीमध्ये जमा होतात, त्यामुळे गाडीची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. गाडीचे काही पार्ट्स नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक आहेत.

Image Credited – Amarujala

रस्त्यावरील धुळ-माती एसी डक्टद्वारे इंटेरियरपर्यंत पोहचतात. त्यामुळे कारमधील कारपेट, प्लोर मेट्स, पेडल्स, लिव्हर आणि कार्गो स्पेसला वॅक्यूम क्लिनरच्या मदतीने साफ करा. सीट फॅब्रिकचे असतील तर त्यांना प्रोफनलच्या मदतीने ड्राय करा.

Image Credited – Amarujala

स्टेअरिंगला सर्वाधिक स्पर्श होत असतो, त्यामुळे गाडीचे स्टेअरिंग स्वच्छ ठेवावे. गाडीचे हेडलाइनर, विंडोज ग्लास, हेडरेस्ट स्वच्छ करावे. याशिवाय विंडो स्विच, ऑडिओ कंट्रोल, एसी बटन, टचस्क्रीन डिस्प्ले साफ करायला विसरू नये.

हिटिंग, वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग (एचव्हीएसी) ही पुर्ण सिस्टम स्वच्छ करावी. गाडीचे एअर फिल्टर स्वच्छ करा व कूलेंटला टॉप-अप करायला विसरू नका. केबिल फिल्टर देखील स्वच्छ करा व यासाठी एरोसोल बेस्ड एसी डिसइनफेक्टेंट स्प्रे क्लीनर वापरा.

Image Credited – Amarujala

कारच्या आतील व बाहेरील डोर हँडल्सला आपण सर्वाधिक स्पर्श करतो. त्यामुळे याला व्यवस्थित सॅनेटाइज करावे.

Image Credited – Amarujala

गाडीत सॅनेटाइज करण्यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टी जसे की, हँड सेनेटाइजर, वेट वाइप्स, मास्क, हातमोजे कारमध्ये ठेवा. तसेच ओल्या टिशूने नियमित स्टेअरिंग व्हिल, डोर हँडल्स, गिअर शिफ्ट नॉब, हँडब्रेक लिव्हर स्वच्छ करा.

Image Credited – Amarujala

बाईक वापरताना सर्वाधिक स्पर्श हँडलबार आणि सीटला होतो. या दोन्ही गोष्टींना नियमित सॅनेटाईज करा. याशिवाय गाडी चालवण्याआधी  हँडलबार आणि सीटला ओल्या टिशूने साफ करा.

Leave a Comment