कोरोना : बचावासाठी सर्वांनी मास्क लावणे आवश्यक आहे का ?

कोरोना व्हायरसच्या महामारीने आतापर्यंत जगाभरात 7 हजारांपेक्षा अधिक जणांचे प्राण घेतले आहे. या व्हायरसच्या संसर्गपासून वाचण्यासाठी लोक विविध गोष्टी करत आहेत. लोक घरातून बाहेर पडणे, सार्वजनिक ठिकाणे जाणे टाळत आहेत. जे लोक बाहेर पडत आहेत, बस अथवा मेट्रोमधून प्रवास करताना ते मास्क लावत आहेत. मात्र सर्वांनी मास्क लावणे आवश्यक आहे का ? या सर्व गोष्टींबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

सर्वांनी मास्क घालणे गरजेचे ?

प्रत्येकाने मास्क घालणे गरजेचे नसून, केवळ संक्रमित व्यक्तीने मास्क घालणे गरजेचे आहे. खोकला, ताप अथवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास मास्क घालणे गरजेचे आहे. कोरोनाग्रस्त असल्यास अथवा कोरोना संशयित व्यक्तीची काळजी घेत आहे, जसे की डॉक्टर्स, नर्स अथवा पीडित परिवारातील सदस्यांनी मास्क घालणे गरजेचे आहे. तुमच्या भागात जर एखादा कोरोनाग्रस्त असेल तर मास्क घालावे.

मास्क परिधान करताना देखील काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. मास्कचे दोन्ही भाग वेगवेगळे आहेत का ते बघा. तुमचा चेहरा, नाक झाकला जाईल, अशा प्रकारे मास्क परिधान करा. मास्कला वारंवार हात लावू नये.

अनेकदा पाहायला मिळते की मास्क चेहऱ्यावरून दूर करून लोक गळ्यात अडकवतात, असे करू नये. जर व्हायरस तुमच्या मास्कवर आल्यास, गळ्याद्वारे तुम्हाला संक्रमित करू शकतो.

लोक एकच मास्क दिवसभर वापरत असतात. मात्र असे न करता, मास्क ओला झाल्यास 6 तासांनी बदलावा. डिस्पोजल मास्कचा पुन्हा वापर करू नये व त्याला नेहमी कचऱ्यातच टाकावे. मास्क काढताना शरीराच्या कोणत्याही दुषित भागाला स्पर्श करू नये. मास्क काढल्यानंतर हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment