कोरोना : फेसबुक सर्व कर्मचाऱ्यांना देणार एवढा बोनस

अ‍ॅपल, गुगल, ट्विटर आणि फेसबुक सारख्या दिग्गज टेक कंपन्यांनी कोरोना व्हायरसमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. मात्र आता फेसबुकने सांगितले आहे की, घरून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 1 हजार डॉलर म्हणजेच 74 हजार रुपये बोनस देण्यात येईल.

सध्या फेसबुकचे जवळपास 45 हजार कर्मचारी घरून काम करत आहेत. तर काही कर्मचारी कंत्राटीवर काम करत आहेत.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला आहे. ज्यात बोनस आणि कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्या छोट्या उद्योगांच्या मदतीसाठी 30 देशांच्या जवळपास 30 हजार छोट्या उद्योगांना 741 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.

काही दिवसांपुर्वीच एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर कंपनीने सिंगापूर आणि लंडन येथील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ज्या कर्मचाऱ्याला व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळले, तो 23 ते 26 फेब्रुवारी या दरम्यान लंडन कार्यालयात गेला होता. त्यामुळे सतर्कता दाखवत कार्यालय स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील सर्व कर्मचारी घरून काम करत आहेत.

Leave a Comment