कोरोना : आर्थिक कमाईसाठी घरून करा हे काम

भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत आहे. या व्हायरसच्या प्रभावामुळे सरकारने शाळा आणि कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला असून, कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. मात्र काही कार्यालय बंद असल्याने कर्मचारी घरीच बसून आहेत. अशा प्रसंगी घरी बसल्या बसल्या आर्थिक कमाईसाठी काही पर्याय शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला काही ऑनलाईन बिझनेसविषयी सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही चांगली कमाई करू शकता.

Image Credited – Amarujala

ब्लॉग लिहून कमाई –

जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल, तर तुम्ही ब्लॉग लिहून पैसे कमवू शकता. ब्लॉगर आणि वर्डप्रेसवर तुम्ही ब्लॉग तयार करू शकता. ज्या विषयीची तुम्हाला पुर्ण माहिती आहे, त्याविषयी तुम्ही लिहू शकता. जसजसे वाचक वाढत जातील, त्यानंतर तुम्ही जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकता.

Image Credited – Amarujala

मॅग्झिनसाठी लेख –

जर तुम्हाला एखाद्या विषयाचे संपुर्ण ज्ञान असेल, तर तुम्ही पेड रायटिंगद्वारे पैसे कमवू शकता. तुम्ही मॅग्झिन, वेबसाईट अथवा अन्य माध्यमांसाठी लेख लिहून कमाई करू शकता.

 

Image Credited – RCR Education

ई-ट्यूशन –

इंटरनेटच्या काळात ई-ट्यूशनची मागणी वाढली आहे. जर तुम्हाला शिकवण्याची आवड असेल, तर तुम्ही याद्वारे पैसे कमवू शकता.

Image Credited – Amarujala

ऑनलाईन शॉपिंगची घ्या मदत –

तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट जसे की, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि स्नॅपडीलद्वारे विविध वस्तूंची एफिलिएट मार्केटिंग करू शकता व त्याद्वारे भरपूर कमाई करू शकता.

Image Credited – Amarujala

ऑनलाईन जाहिराती –

जाहिरातींवर क्लिक केल्यावर पैसे देणाऱ्या अनेक वेबसाईट्स आहेत. क्लिकसेन्स (Clixsense) अशीच एक वेबसाईट आहे. या साईटद्वारे तुम्ही मोठी कमाई करू शकता. याचे पैसे तुम्हाला पेपलद्वारे मिळतात.

Leave a Comment