कोरोना : मोबाईलला साफ करताना ही चूक केल्यास डिव्हाईस होईल खराब

कोरोना व्हायरसचा प्रसार भारतात वाढत चालला आहे. आतापर्यंत जवळपास 150 लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. आपल्या हातातील डिव्हाईसवरील व्हायरपासून देखील संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये मोबाईल स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. मात्र फोन साफ करताना योग्य केमिकल वापरन व्यवस्थितरित्या साफ करणे गरजेचे आहे, अन्यथा फोन खराब होऊ शकतो.

Image Credited – Amarujala

स्मार्टफोनला साफ करताना ब्लिचिंग पाउडरचा वापर केल्यास फोनचा डिस्प्ले खराब होईल व बॉडीचा रंग उडेल. या शिवाय विनेगरचा देखील वापर करू नये.

Image Credited – Amarujala

अ‍ॅपलनुसार, आयफोन स्वच्छ करण्यासाठी कोणताही स्प्रे वापरणे धोकादायक आहे. फोनला स्वच्छ करण्यासाठी त्याला कोणत्याही तरळ पदार्थात बुडवू नका. मोबाईल स्वच्छ करण्यासाठी थेट अल्काहोलचा वापर करू नका.

Image Credited – Hygiene Depot

मोबाईल स्वच्छ करण्यासाठी केवळ जंतूनाशक वाइप्सचा वापर करावा. ज्यात कमीत कमी 70 टक्के आयसोप्रोपिल अल्काहोल असावे. डिव्हाईसला साफ करताना डिस्पोजल ग्लॉव्सचा वापर करावा.

Image Credited – Amarujala

डिस्प्ले पुसताना लेंस क्लिनर सारख्या मऊ कापडाचा वापर करावा. मोबाईलवर जंतूनाशक टाकल्यानंतर पेपर टॉवेलचा वापर करू शकतात. आयपी68 रेटिंग सोबत येणाऱ्या स्मार्टफोनला साबण आणि पाणीचा हँड सॅनेटायजरद्वारे साफ करता येतो. फोनला स्वच्छ केल्यानंतर साबणाने चांगल्याप्रकारे धुवा.

Leave a Comment