एक महिना कोणतेही आंदोलन करणार नाही भाजप


नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडयात दिवसेंदिवस रुग्ण वाढ होत असून देशभरात आत्तापर्यंत १४७ रुग्ण आढळून आले आहेत. भाजपने आरोग्य आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर एक महिना देशभरात कोठेही आंदोलन, प्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोणत्याही आंदोलनात भागही घेणार नाही. भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी याबाबत माहिती दिली.

पंतप्रधान मोदी काल झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी आंदोलन, प्रदर्शन टाळायला हवे, असे म्हणाले होते. हे लक्षात घेता कोणतेही आंदोलन न करण्याचे तसेच आंदोलनात भाग न घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपचे अध्यक्ष जे. डी नड्डा यांनी पुढील एक महिन्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

एखादे निवेदन जर द्यायचे असेल तर ४ ते ५ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ते संबधित कार्यालयाला द्यावे. गर्दी करु नये. सर्व राज्यातील कार्यालयांना यांची माहिती पाठवण्यात आल्याचे नड्डा म्हणाले. सर्व राज्य सरकारांना केंद्र सरकारने सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. मॉल्स, शाळा महाविद्यालये, संग्रहालये आणि इतर पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक गरज नसताना प्रवास टाळण्याबरोबरच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Comment