यमुनानगर मधील धर्मंचक्र लिम्का बुक मध्ये


फोटो सौजन्य भास्कर
हरियाणाच्या यमुनानगर मधील टोपरा कलागावात जानेवारी २०१९ मध्ये उभारण्यात आलेल्या धर्मचक्राची नोंद देशातील सर्वात मोठे धर्मचक्र म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आले असून तसे सर्टिफिकेट गावाला दिले गेले आहे. या भल्या मोठ्या चक्राचा व्यास ३० फुट असून त्यात २४ आरे आहेत. २५०० वर्षापूर्वी सध्या जे अशोक चक्र म्हणून ओळखले जाते त्याला धर्म चक्र असे म्हटले जात असे. हे चक्र आपले राष्ट्रीय चिन्ह आहे.

यमुनानगर मधील धर्मचक्र सिद्धार्थ आणि सत्यदीप या दोघा भावांनी उभारले आहे. त्यांना ग्रामपंचायतीने सहाय्य केले. हे चक्र तयार करणे मोठे आव्हान होते त्यामुळे जागेवर आणूनच त्याचे सर्व भाग तयार केले गेले व तेथेच जोडले गेले. हे धर्मचक्र तयार करण्यास २४० दिवस लागले.

या संदर्भात बोलताना डॉ. सत्यदीप गौरी म्हणाले, या चक्राचा उपयोग पूर्वी बुद्ध आणि त्याचे विचार स्वरुपात होत असे. सम्राट अशोकाने धर्मचक्राला त्याच्या धर्मस्तंभच्या वरचे स्थान दिले. या धर्मचक्रात २४ आरे आहेत. त्यातील पहिले बारा बुद्धाचे विचार आणि बाकीचे बारा मनाची तटस्थ अवस्था याचे प्रतिक आहेत. त्याच्यामुळे निर्वाणाचा मार्ग मिळतो. या धर्मचक्राचा रंग सोनेरी असून हा रंग अध्यात्मात सर्वात शुध्द रंग समजला जातो.

Leave a Comment