अमेझॉन अमेरिकेत करतेय १ लाख कर्मचारी भर्ती


फोटो सौजन्य सीएनबीसी
ऑनलाईन शॉपिंग साईट अमेझॉनने अमेरिकेत १ लाख फुलटाईम आणि पार्टटाईम नोकर भरती सुरु केली आहे. जगभर करोनाच्या प्रभावामुळे नागरिकांना घरात बंद होण्याची पाळी आली असल्याचा परिणाम ऑनलाईन शॉपिंग वाढण्यात झाला असून आता जीवनावश्यक वस्तू ही ऑनलाईन मागविणे भाग पडते आहे. लोक पूर्णपणे ऑनलाईन शॉपिंगवर विसंबले असल्याचा परिणाम अमेझॉनवरील वस्तूंची मागणी प्रचंड प्रमाणात वाढण्यावर झाला आहे. त्यामुळे अमेझॉनला डिलीव्हरी देणारे तसेच फुलफिलमेंट सेंटर्स मध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असल्याचे वृत्त सीएनएन ने दिले आहे.

ग्राहकांनी ऑर्डर केलेले सामान त्यांना वेळेत पोहोचविता यावे यासाठी प्रामुख्याने नवीन भरती केली जात आहे. अमेरिकेत करोनाच्या ४ हजार केसेस आढळल्या आहेत. या मुळे अनेक ठिकाणी लोक घरात बंद आहेत. अमेझॉनवर अनेक ब्रांडेड उत्पादने आउट ऑफ स्टॉक झाली आहेत. यात ब्रांडेड टोयलेट पेपर, डीसइन्फेक्टंट याचा समावेश आहे. अमेरिकेत अमेझॉन त्यांच्या कर्मचाऱ्यांना सध्या तासाला १५ डॉलर्स म्हणजे ११०८ रुपये मोबदला देते. नवी भरती करताना जादा मोबदला देता यावा यासाठी कंपनीने ३५० मिलियन डॉलर्स म्हणजे २५९२ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment