तुमच्या आवडीची कॉफी सांगते तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही


तुम्हाला आवडणारा कॉफीचा प्रकार, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगून जातो. त्यामुळे आता कधी मित्रमैत्रिणींसोबत कॉफी प्यायला बाहेर गेलात, तर ते कशा प्रकारची कॉफी घेणे पसंत करतात, हे पाहून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू तुमच्या लक्षात येतील. आजकाल कॉफीचे अनेक प्रकार लोकप्रिय आहेत. कोणाला ‘लाटे’ आवडते, तर कोणाला ‘एस्प्रेसो’, कोणाला ‘मोका’ आवडते, तर कोणाला ‘कॅपुचिनो’..त्यामुळे जसे कॉफीचे प्रकार निरनिराळे, तसेच त्यांच्याशी निगडीत असणारी व्यक्तिमत्वे देखील निरनिराळी.. त्यामुळे पुढच्या वेळी कॉफी घेताना ही तथ्ये केवळ मनोरंजन म्हणून पडताळून पाहायला काहीच हरकत नाही.

जर एखाद्या व्यक्तीला ‘एस्प्रेसो’ हा कॉफीचा प्रकार आवडत असेल, तर ती व्यक्ती काहीशी लहरी, किंवा मूडी असते. त्याच्याशी निगडीत प्रत्येक वस्तू वर त्यांचे नियंत्रण असणे त्यांना पसंत असते. अश्या व्यक्ती नेहमी भविष्याचा विचार करतात. या व्यक्ती सर्व कामे वेळशीर होण्याबद्दल आग्रही असतात. कोणत्याही प्रकारची असफलता, किंवा अकार्यक्षमता या व्यक्तींना अजिबात पसंत नसते. या व्यक्ती लहरी स्वभावाच्या असल्याने यांना समजून घेणे काहीसे कठीण जरी असले, तरी या व्यक्ती अतिशय उत्तम सहकारी, मित्र आणि विश्वासू जोडीदार ठरतात. या व्यक्तींना यांच्या खासगी आयुष्यात कोणी लुडबुड केलेली अजिबात आवडत नाही, पण या व्यक्ती माणूसघाण्या देखील नाहीत. मैत्री करणे यांना आवडते.

जर एखाद्या व्यक्तीला ‘कॅपुचीनो’ आवडत असेल, तर ती व्यक्ती अतिशय ‘एक्स्ट्रोव्हर्ट’, म्हणजेच सर्वांशी अतिशय मनमोकळेपणाने वागणारी, आणि आशावादी असते. या व्यक्ती अतिशय ‘ हॅपी गो लकी’ असून त्यांचे विचार आणि सहवास, वातावरण सकारात्मक करणारे असतात. या व्यक्तींना नवनवे प्रयोग करून बघण्यास आवडते, पण ह्या व्यक्ती चंगळवादी नाहीत, म्हणजेच सुट्टीच्या दिवशी एखाद्या महागड्या मॉलमध्ये जाऊन खरेदी, जेवण असल्या गोष्टी टाळून या व्यक्ती घरीच बसून टीव्हीवर आपला आवडता कार्यक्रम किंवा चित्रपट पाहणे पसंत करतात. या व्यक्तींना इतरांशी मैत्री करणे आवडत असले, तरी आपल्या खासगी बाबींपासून आपल्या मित्रमंडळींना लांब ठेवणे पसंत करतात. कामाच्या बाबतीतही या व्यक्ती अतिशय नीटनेटक्या असतात.

जर एखाद्या व्यक्तीला ‘लाटे’ आवडत असेल, तर अशी व्यक्ती अतिशय स्टायलिश, फॅशन बद्दल जागरूक असणारी असते. बदलत्या फॅशन आणि ब्युटी ट्रेंड्स कडे या व्यक्तींचे बारकाईने लक्ष असते. वर्तामानपत्रातील इतर बातम्या पाहण्याआधी ‘ पेज थ्री ‘ वाचून काढायला यांना आवडते. या व्यक्ती अतिशय उत्साही असून, नेहमी चांगले दिसण्याबद्दल या आग्रही असतात. आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे या व्यक्ती इतरांना स्वतःकडे चटकन आकृष्ट करून घेतात. यांना गप्पा मारणे आवडते, आणि वाद-विवादाचा प्रसंग आलाच, तरी ही या व्यक्ती अजिबात मागे हटत नाहीत.

एखाद्या व्यक्तीला जर ‘मोका’ आवडत असेल, तर ती व्यक्ती स्वभावाने मृदू असते. यांच्यामध्ये नेहमीच उत्साह दिसून येतो. या व्यक्ती स्वभावाने अतिशय मृदू असल्या तरी हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एकाच पैलू आहे. या व्यक्ती अतिशय खंबीर आणि आपल्या निश्चायांवर ठाम असणाऱ्या असतात. परिस्थिती कितीही बिकट असली, तरी या व्यक्ती अजिबात घाबरून जात नाहीत. पएखाद्यावर मनापासून प्रेम करण्याची कल्पना यांना आवडते, पण ‘कमिटमेंट’ करतना या व्यक्ती शंभर वेळा विचार करणाऱ्या असतात. या व्यक्तींची इच्छाशक्ती अतिशय बळकट असल्याने यांना जे हवे ते मिळविण्यासाठी ह्या व्यक्ती पडतील तेवढे कष्ट घेण्यास तयार असतात. या व्यक्ती व्यवहाराला अतिशय चतुर असतात. याच चतुरतेने इतरांकडून कामे करवून घेणे त्यांना चांगले अवगत असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment