रस्त्यांवरच्या या रेषांचे अर्थ नेमके काय?


आपण जेव्हा रस्त्यांवरून, विशेषतः हायवे वरून, किंवा मल्टीपल लेन रोडवरून प्रवास करीत असतो, तेव्हा रस्त्याची विभागणी करणाऱ्या रेषा आपल्याला रस्त्यावर दिसतात. या रेषांचा उद्देश केवळ रस्त्याची दोन भागांमध्ये विभागणी करण्यापुरताच मर्यादित नसतो. या रेषांचे देखील निरनिराळे प्रकार असतात. प्रत्येक प्रकारच्या रेषेला काही ठराविक अर्थ असतो. या रेषा नेमक्या कशासाठी असतात, हे तुम्हाला माहिती नसेल, तर ते जाणून घेऊ या.

जर रत्याच्या मध्यभागी पांढऱ्या रंगाची एकसंध जाडसर रेघ असेल, तर तुम्ही ही पांढरी रेष ओलांडून पलीकडे जाऊ नये असा या रेषेचा संकेत आहे. ज्या लेनमधून तुम्ही वाहन चालवीत आहात, त्याच लेनमध्ये राहून तुम्ही वाहन चालविणे अपेक्षित असते. जर हीच पांढरी रेषा तुटक असेल, तर तुम्ही वाहन चालविताना तुमची लेन बदलू शकता असा हा संकेत आहे. मात्र लेन बदलताना इतर वाहनांना इंडिकेटर द्वारे तशी पूर्वसूचना अवश्य द्यावी.

जर रस्त्याच्या मधोमध पिवळ्या रंगाची एकसंध एक रेघ असेल, तर तुम्ही इतर वाहनांना ओव्हरटेक करू शकता, मात्र तसे करताना या पिवळ्या रेघेच्या पलीकडे तुम्ही जाता काम नये असा संकेत देणारी ही रेषा आहे. या रेषेचे अर्थ, निरनिराळ्या राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. उदाहरणार्थ तेलंगाना राज्यामध्ये पिवळी रेघ रस्त्यावर असताना, इतर गाड्यांना ओव्हरटेक करू नये असा संकेत आहे.

जर रस्त्यावर एकसंध पिवळ्या रेषेच्या जोदिएन तुटक पिवळी रेषा असेल, आणि तुम्ही तुटक रेषेच्या बाजूने गाडी चालवत असाल, तर तुम्ही तुमच्या पुढील वाहनाला ओव्हरटेक करू शकता, पण जर एकसंध पिवळी रेषा असेल, तर त्या क्षेत्रात तुम्ही इतर वाहनांना ओव्हरटेक न करणे अपेक्षित असते.

Leave a Comment