बहुगुणकारी मुळ्याची पाने


मुळ्याचे आपल्या आरोग्यासाठी असणारे फायदे आपण सर्व जाणताच. पण मुळ्याच्या एवढीच मुळ्याची पाने देखील आरोग्याला फायदेशीर आहेत. त्यामुळे यांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये आवर्जून करायला हवा. मुळ्याची भाजी किंवा मुळ्याचे पराठे, किंवा सॅलड मधील मुळे सर्वांना आवडतात. या पदार्थांमध्ये मुळ्याबरोबर मुळ्याची पाने घातली की याचे फायदे आपल्या आरोग्यासाठी मिळू शकतात.

जर पुष्कळ दिवस सर्दी किंवा खोकला बरा होत नसेल, तर आपल्या आहारामध्ये मुळ्याच्या पानांचा समावेश करावा. मुळ्याच्या पानांमध्ये छातीतील congestion दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर मुळ्याच्या पानांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास ही मदत होते. जर शरीरामध्ये सतत थकवा जाणवत असेल, तर तो थकवा मुळ्याच्या पानांच्या सेवनाने दूर होईल.

मुळ्याच्या पानांमध्ये फायटोकेमिकल्स आणि एंथॉकायनिन ही दोन तत्वे मोठ्या प्रमाणावर असतात. या दोन्ही तत्वांनी कर्करोग होण्याची संभावना कमी होते. या पानांमध्ये असलेली जीवनसत्वे शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. तसेच या मध्ये पोटॅशियम आणि अँटी हायपरटेन्सिव्ह प्रॉपर्टीज असल्याने उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी या पानांचे सेवन अतिशय गुणकारी आहे.

मुळ्याच्या पानांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने यांच्या सेवानाने रक्तातील साखर वाढत नाही, तसेच पचनशक्ती देखील चांगली राहते. मुळ्याच्या पानांच्या सेवनाने शरीरातील घातक तत्वे बाहेरटाकण्यास मदत होते. त्यामुळे किडनीचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment