पुण्याच्या ग्रामीण भागातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश


पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आल्या असून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका सर्व महानगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत कोरोनामुळे होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून यापूर्वीच आदेश काढण्यात आले आहेत.

त्याचबरोबर 31 मार्च २०२० पर्यंत महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, शहरालगतच्या जवळपास असलेल्या अशा मोठ्या शैक्षणिक संस्था देखील बंद ठेवण्याबाबत सुचित करण्यात आले. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये 31 मार्च 2020 पर्यंत ग्रामीण क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद, सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालय व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था ह्या बंद ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

तथापि, 10 व 12 वीच्या परीक्षा वरील सर्वच क्षेत्रात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या अनुषंगाने वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षांसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून कार्यवाही करण्यात येत असून त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित संस्था प्रमुखास देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment