या गावातील प्रत्येक व्यक्ती व्यक्तीची उंची ४ फुटांपेक्षा जास्त वाढतच नाही


केवळ आपल्याच देशात आश्चर्यकारक गोष्टी आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण जगात इतरत्रही अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. ज्यांच्या मागचे सत्य शोधणे शास्त्रज्ञांसाठीही कठीण काम होऊन बसले आहे. त्यापैकीच एक आहे चीनमधील यांग्सी गाव. त्या कारण देखील तसेच आहे. या गावातील प्रत्येकजण बुटका असल्यामुळे या गावाला बुटक्यांचे गाव म्हणून ओळखले जाते.

या गावातील लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोक बुटके असून यातील ७० पैकी ३० जणांची उंची केवळ २ ते ४ फुटांच्या दरम्यानच राहते. शास्त्रज्ञांदेखील त्या मागचे शास्त्रीय कारण अजूनही समजू शकलेले नाही. याठिकाणी बुटक्यांचा जन्म होत असल्याचे १९५१मध्ये समजले. त्यानंतर केवळ आपल्या कुटुंबामध्ये बुटक्यांचा जन्म होऊ नये म्हणून लोकांनी इतर शहरांमध्ये स्थलांतर केले.

तेथील लोकांचे असे म्हणणे आहे की, वाईट शक्तींचा प्रभाव या गावामध्ये असून त्यांच्या पूर्वजांचे अंत्यविधी व्यवस्थितरित्या केले जात नसल्यामुळे देखिल असे होत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच जपानने चीनवर हल्ला केला तेव्हा विषारी वायू सोडला होता, हेही त्यामागचे कारण असल्याचे महटले जाते.

Leave a Comment