नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या शिफारसीमुळे देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेसाठी निवड झाली आहे. ३ ऑक्टोबर २०१८ रोजी माजी न्या. गोगोईंनी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी १३ महिने सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळली होती. रंजन गोगोई गेल्यावर्षी १७ नोव्हेंबरला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले.
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड
राज्यसभेवर १२ सदस्यांची निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. त्यातील एका खासदाराचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर रंजन गोगोई यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी गृहमंत्रालयाने याबाबतीच अधिसूचना काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे.
आपल्या कार्यकाळात माजी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी अयोध्या खटला आणि शबरीमाला मंदिरासारख्या महत्त्वपूर्ण प्रकरणांचा निकाल दिला. त्याचबरोबर गेल्या कित्येक वर्षांपासून आसाममध्ये प्रलंबित असलेले एनआरसी गोगोई यांच्याच कार्यकाळात लागू झाले. त्याचबरोबर गोगोई यांच्या खंडपीठाकडूनच राफेल विमानांच्या खरेदीत मोदी सरकारलाही क्लीन चीट देण्यात आली होती.