मॅकडोनल्ड प्रमाणेच स्वीगी, झोमॅटोची कॉन्टॅक्टलेस डिलीव्हरी सेवा


फोटो सौजन्य इंडिया डॉट कॉम
भारतात करोना विषाणूचा प्रसार वेगाने होऊ लागल्याने सर्वच व्यवसाय अडचणीत आले असून त्याला फास्टफूड चेन सुद्धा अपवाद नाहीत. मात्र यातून मार्ग काढण्यासाठी मॅकडोनल्ड, डॉमीनोज यांनी कॉन्टॅक्टलेस डिलीव्हरी सेवा सुरु केल्या असून त्या यादीत आता स्वीगी आणि झोमॅटो यांचाही समावेश झाला आहे. डॉमिनोजने देशातील १३२५ रेस्टॉरंटमध्ये अशी सेवा सुरु केली आहे. डॉमिनोजच्या ग्राहकांना ही सेवा घेण्यासाठी अॅपचे लेटेस्ट व्हर्जन वापरावे लागणार आहे. त्यात ग्राहक झिरो कॉन्टॅक्टलेस डिलीव्हरी असा उल्लेख करू शकतील.

या सेवेनुसार ग्राहकाने ऑर्डर दिल्यावर डिलीव्हरी एग्झीक्युटीव्ह ग्राहकाच्या घरी कॅरीबॅगमधून दारासमोर ठराविक अंतरावर पार्सल आणून ठेवतील आणि स्वतः सुरक्षित अंतरावर उभे राहतील. ग्राहक जोपर्यंत पार्सल घेत नाही तो पर्यंत ते उभे राहतील. प्रीपेड ऑर्डरवर सुद्धा ही सेवा उपलब्ध आहे. त्याचबरोबर ही सेवा देणाऱ्या सर्व कंपन्या त्याचे कर्मचारी स्वच्छता आणि सुरक्षा पालन करत आहेत याची पूर्ण काळजी घेणार आहेत.

डिलीव्हरी देणारे ऑर्डरला नुसत्या उघड्या हाताने स्पर्श करणार नाहीत. ठरलेल्या जागेवर पॅकेट ठेवतील असेही स्पष्ट केले गेले आहे. भारतात करोना संसर्ग झाल्याची संख्या ११४ वर गेली असून जगात या विषाणूने बळी घेतलेल्यांची संख्या ७ हजारावर गेली आहे.

Leave a Comment