‘त्या’ शरणार्थी मुलाच्या मृत्यूप्रकरणी 3 जणांना 125 वर्षांशी शिक्षा


अंकारा – तुर्कीच्या बोडरम समुद्र किनाऱ्यावर सप्टेंबर 2015 साली मिळालेल्या 3 वर्षीय ऐलान कुर्दीच्या मृतदेहाचे फोटो जगभरातील सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. सीरियाच्या गृहयुद्धातून जीव वाचवून ऐलानचे आई-वडील मुलांसोबत दुसऱ्या देशात शरण घेण्यासाठी निघाले होते. त्यांची बोट यावेळी समुद्रात बुडाली. मुलगा आणि आईचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता, तर वडील अब्दुल्ला वाचले. नंतर ऐलानचा अंत्यविधी बोडरमच्या किनारपट्टीवर करण्यात आला. आपल्या नातेवाईकांकडे शरण घेण्यासाठी यूरोपमार्गे हे कुटुंबिय कॅनडाला जात होते.

आता 3 वर्षीय सीरियाई शरणार्थी ऐलान कुर्दीच्या मृत्यूप्रकरणी तुर्कीच्या एका न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. तीन आरोपींना याप्रकरणी मानव तस्करीच्या आरोपात 125 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्या तिघांना तुर्की सेनेने काही दिवसांपूर्वीच अटक केली होती.

इराकच्या इरबी शहरात ऐलानचे वडील अब्दुल्ला राहतात. त्यांनी सांगितले की, संपूर्ण युरोपने आपल्या मुलाचा फोटो पाहून शरणार्थ्यांसाठी दरवाजे उघडले, पण जास्त वेळेसाठी नव्हते. यूनाइटेड नेशन्सने सांगितल्यानुसार, 2011 पासून आतापर्यंत 67 लाख सीरियाई नागरिकांनी युद्धामुळे घर सोडले आहे.

Leave a Comment