ही आहेत मेनिन्जायटीसची लक्षणे


मेंदूच्या किंवा स्पायनल कॉर्डच्या आसपास असलेल्या संरक्षक मेम्ब्रेन्सला झालेले कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा सूज मेनिन्जायटीस ही व्याधी होण्यास कारणीभूत ठरू शकते. ह्या व्याधीचे अनेक प्रकार असू शकतात. पण ह्याची लक्षणे पुष्कळ प्रमाणात एकसारखी आहेत. लहान मुलांना हा विकार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पालकांना या विकाराची सामन्य लक्षणे माहिती असणे अगत्याचे आहे.

अचानक आलेला ताप मेनिन्जायटीसचे लक्षण असू शकते. या तापामध्ये रुग्णाला थंडीने हुडहुडी भरते. तसेच सतत थंडी वाजत राहते. पण हे लक्षण इतरही अनेक रोगांचे असल्यामुळे त्या रोगांसाठी ही रुग्णाची तपासणी करणे आवश्यक आहे. तापाच्या जोडीने इतर कोणती लक्षणे दिसत आहेत, या कडे बारकाईने लक्ष दिले जाणे आवश्यक आहे. रोगाचे निदान करताना ही माहिती अतिशय आवश्यक ठरते.

मेनिन्जायटीस या रोगामध्ये तापासोबत उद्भवते ती डोकेदुखी. ही डोकेदुखी नुसती जास्तच नाही, तर असह्य असते. ही डोकेदुखी इतकी जास्त असते, की याच्या वेदना मानेपर्यंत जाणवतात. पण डोकेदुखी चे प्रमाण फारच जास्त असल्याने मानेचे दुखणे लक्षात न येण्याची शक्यता असते. नवजात अर्भकांमध्ये जर टाळूवर सूज असेल, तर हे मेनिन्जायटीस चे लक्षण असू शकते. मेनिन्जायटीस झालेली व्यक्ती, त्याची दृष्टी एखाद्या वस्तूवर नीट ‘ फोकस ‘ करू शकत नाही. त्यामुळे अंधुक दिसणे, किंवा एका ऐवजी दोन वस्तू दिसणे अश्या तक्रारी उद्भवितात.

मेनिन्जायटीसच्या रुग्णाची भूक अतिशय कमी होते. याला कारण, त्या रुग्णाला सतत होणारा नॉशिया देखील असू शकेल. रुग्णाची अन्नावरची वासना अगदी नाहीशी होते. बहुतेक वेळी पोटदुखी किंवा उलट्यांचा त्रास ही सुरु होतो. मेनिन्जायटीसचे अजून एक लक्षात घेण्यासारखे लक्षण म्हणजे, रुग्णाला डोळ्यांवर प्रकाश अजिबात सहन होत नाही. डोळ्यांवर प्रकाश पडला की डोळ्यांतून पाणी यायला लागते. त्याच्याबरोबर वाढत जाणारी डोकेदुखी आणि नॉशिया तब्येत आणखी खराब होण्यास कारणीभूत ठरतात.

ही मेनिन्जायटीसची सर्वसामान्यपणे आढळणारी लक्षणे आहेत. पण यातील काही लक्षणे इतर रोगाची लक्षणे देखील असू शकतात. त्यामुळे रोगाचे योग्य, अचूक निदान होण्यासाठी तज्ञांचा सल्ला अत्यावश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment