अश्याही काही विचित्र मेडिकल कंडीशन्स…


विचित्र मेडिकल कंडीशन्सचा उल्लेख करता क्षणीच आपल्याला डिस्कव्हरी वाहिनीवरील एखादा कार्यक्रम डोळ्यासमोर येतो. त्यामध्ये नाना तऱ्हेच्या मेडिकल कंडीशन्स असलेल्या व्यक्ती दाखविल्या जातात. कोणाला तीन पाय असतात, तर कोणाला अंगभर मोठे केस असतात. या अश्या मेडिकल कंडीशन्स आहेत, ज्या मानवी शरीरातील ‘जीन्स’ मुळे उद्भविल्या आहेत. अशाच काही विचित्र मेडिकल कंडीशन्स बद्दल माहिती, माझा पेपरच्या वाचकांसाठी.

हेमीस्पॅशियल निग्लेक्ट नामक मेडिकल कंडीशन मध्ये व्यक्तीच्या मेंदूची एक बाजू मोठ्या प्रमाणात निकामी होते. परिणामी व्यक्तीला वस्तूचा केवळ एकाच भाग दिसू शकतो. अश्या व्यक्तींना कागदावर गोल काढायला सांगितल्यास, त्या केवळ अर्धेच वर्तुळ काढू शकतात. ही मेडिकल कंडीशन बहुतेक वेळी डोक्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने इजा झाल्यामुळे उद्भवते. या मेडिकल कंडीशन मधून बरे होण्यासाठीचे उपचार खूप वेळ घेणारे आहेत. तसेच यातून बरे होण्यासाठी लागणारा काळ देखील खूप जास्त आहे.

स्टोन मॅन सिंड्रोम या मेडिकल कंडीशन मध्ये शरीरातील स्नायू हाडांमध्ये परिवर्तीत होतात. या आजारावर आजतागायत कोणतीही उपचारपद्धती सापडलेली नाही. हा आजार अतिशय दुर्मिळ असून, साधारण दोन मिलियन लोकांमध्ये एका व्यक्तीला हा आजार होतो. ह्या आजाराची लक्षणे अगदी लहान वयातच दिसून येतात. यामध्ये सर्वप्रथम मुलाची पावले वेड्यावाकड्या आकाराची व अतिशय मोठी दिसू लागतात. त्यानंतर पाठ, डोके, खांदे आणि मान या अवयवांवर अतिशय दुखरी ‘ नोड्यूल्स ‘ उद्भवितात.

फेटल फॅमिलियल इनसोम्निया नामक आजार पालकांकडून मुलांमध्ये येतो. या आजाराचे जीन्स पालकांमध्ये असतील, तर ते मुलांमध्ये येतात. वयाच्या चाळीशी पर्यंत हे जीन्स ‘ डॉर्मंट ‘ म्हणजेच निष्क्रिय असतात. पण त्यानंत मात्र हे जीन्स सक्रीय होतात. परिणामी सर्वप्रथम व्यक्तीच्या मेंदूच्या कार्यावर याचा परिणाम होतो. त्यानंतर हळू हळू व्यक्तीचे वागणे बोलणे देखील बदलू लागते. स्मृतिभ्रंश होऊ लागतो, साध्या सध्या गोष्टींचा उलगडा होईनासा होतो. या आजाराची शेवटची पायरी म्हणजे निद्रानाशाचा विकार. हा आजार माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये देखील आढळतो.

सिंड्रोम एक्स हा अँटी एजीइन्ग ( anti ageing ) डिसीज आहे. म्हणजे या आजारामध्ये व्यक्तीचे वय वाढले, तरी त्याचे शरीर त्यानुसार वाढत नाही. आजवर जगभरामध्ये केवळ सहा व्यक्तींमध्ये हा आजार आढळून आला आहे. या आजारामध्ये वीस वर्षाची व्यक्ती देखील दोन वर्षाच्या लहान मुलाएवढी दिसते. या आजारामध्ये शरीराबरोबर मेंदूची वाढ देखील खुंटलेली असते. या आजारासाठी कोणतेही उपाय उपलब्ध नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment