जर येणारी शिंक रोखून धरली तर…


कधी कधी संभाषणाच्या मध्ये, किंवा कुठली तरी महत्त्वाची मिटिंग सुरु असताना, प्रेझेन्टेशन देत असताना जर शिंक आली, तर ती चटकन रोखून धरण्याकडे आपला कल असतो. वारंवार शिंका येऊ नयेत म्हणून आपण मुद्दाम शिंकांवर लक्ष देणे टाळतो, किंवा रुमालाने नाक आणि तोंड दाबून ठेवतो. पण असे करणे तब्येतीस हानिकारक ठरू शकते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

शिंक रोखून धरल्याने घशाला त्रास होऊ शकतो. नाक आणि तोंड दाबून शिंक रोखून धरण्याचा प्रयत्न केल्यास, घश्यामध्ये झिणझिण्या आल्याप्रमाणे भावना होऊन घश्याला सूज येऊ शकते. तसेच त्यांनंतर अन्न किंवा पाणी गिळण्यास त्रास सुरु होतो, आणि क्वचित घश्यातून कोणताही आवाज बाहेर पडणे देखील बंद होते. ह्या सर्व तक्रारी दूर होण्यासाठी किमान आठवड्याभराचा अवधी लागू शकतो. त्या दरम्यान योग्य औषधोपचार होणे ही गरजेचे असते.

मिटिंग किंवा प्रेझेन्टेशन चालू असताना आलेली शिंक रोखण्याऐवजी, काही काळ रूमच्या बाहेर जावे. तसे करणे शक्य नसेल, तर तोंड आणि नाक दाबून शिंक रोखण्याऐवजी, पाच सेकंद आपला श्वास रोखून धरल्याने देखील शिंक रोखता येऊ शकते. नाक दाबून शिंक रोखली, तर त्यापुढे पुष्कळ वेळ नाक हुळहुळत राहते, आणि सतत शिंक येणार असल्याची भावना होत राहते. अश्या वेळी शिंक येणार असली, तर ती येऊ द्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment