मुंबईसह नवी मुंबईमध्ये आढळले कोरानाचे आणखी 4 पॉझिटिव्ह रुग्ण


मुंबई : कोरोनाचा राज्यात धोका वाढत असल्याचे पाहायला मिळत असून याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन 4 नवीन कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37वर गेली आहे. आरोग्य मंत्र्यांनी मुंबईमध्ये तीन आणि नवी मुंबईत एक रुग्ण आढल्याची माहिती दिली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यानंतर आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्याने मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात आढळले आहेत. हा व्हायरस कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर वेगाने पसरू शकतो. हा व्हायरस शहरात अजून पसरू नये, म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भागांमध्ये जमावबंदी लागू होऊ शकते. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातील सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. राज्यातील सर्व शाळा येत्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Leave a Comment