पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेंटमध्ये जमावबंदी लागू


पुणे : विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या एकत्रित बैठकीनंतर पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेंट परिसरात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात राज्यातील सर्वाधिक म्हणजेच 16 कोरोनाग्रस्त असल्यामुळे पुणे महापालिकेची पथके कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. महापालिकेकडून 30 कर्मचाऱ्यांचे एक पथक अशी सुमारे 125 पथके बनवण्यात आली आहेत. पुण्यात महिन्याभरता आलेल्या देशी-परदेशी नागरिकांच्या भेटी घेऊन ही पथके त्यांना कोरोनासंदर्भात माहिती देणार आहे.

जिल्ह्यातील एखाद्या व्यक्तित कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारीही या पथकांवर देण्यात आली आहे. मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यावर ड्राफ्ट बनवण्याचे काम पोलिस आयुक्तालयात सुरू आहे. कालच जिल्ह्याधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जमावबंदीचा प्रस्ताव दिला होता.

अशा साडे पाच हजार लोकांची माहिती पुणे महापालिकेने ‘डोअर टु डोअर’ राबवलेल्या मोहिमेत समोर आली आहे. ज्यांनी मागील एक वर्षात परदेशी प्रवास केला आहे, अशा लोकांची माहिती घेऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. गरज पडल्यास त्यांना होम कॉरेंटाइन होण्यासाठी सूचना देण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची देखील काळजी घेतली जात आहे. ही मोहीम ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत तिथून तीन किलोमीटरच्या परिसरात आणि जिथे परदेशातून प्रवास करून आलेले लोक राहत आहेत अशा भागांमध्ये प्रामुख्याने राबवली जात आहे.

Leave a Comment