महाराणी एलिझाबेथचे करोनामुळे बर्मिंघम महालातून स्थलांतर


फोटो सौजन्य कॅच न्यूज
ब्रिटीश राजघराण्याचे निवासस्थान असलेल्या बर्मिंघम पॅलेस मधून महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना विंडसर कॅसल मध्ये हलविले गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या स्थलांतराचे कारण इंग्लंड मध्ये झालेला करोनाचा फैलाव हे असल्याचे समजते. करोनाला बळी पडलेल्यांची संख्या जगभरात पाच हजाराच्या वर गेली असून जागतिक आरोग्य संघटनेने करोना महामारी म्हणून घोषित केला आहे. लंडन मध्ये करोनाच्या १४०० केसेस नोंदविल्या गेल्या आहेत आणि २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राणीच्या बर्मिंघम महालातील कर्मचारी धास्तावले असून राणीच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी तिला विंडसर कॅसल मध्ये नेले जात आहे असे समजते.

इंग्लंड मध्ये करोनावर नियंत्रण आणणे अवघड बनलेच तर राजघराण्यातील व्यक्तींचा बचाव करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. राणीची तब्येत चांगली आहे आणि लवकरच तिचा ९४ वा वाढदिवस साजरा होणार आहे. बर्मिंघम महालात जगभरातून येणाऱ्या विविध देशांच्या नेत्याचे सतत आगतस्वागत सुरु असते. त्यातील बऱ्याच जणांची राणी भेट घेते. अश्या परिस्थितीत सल्लागारांनी राणीची सुरक्षा महत्वाची मानून राणीचे स्थलांतर केल्याचे समजते. बर्मिंघम महाल पहायलाही मोठ्या संख्येने पर्यटक येतात. लंडनच्या मधोमध हा राजवाडा असून येथे स्टाफ मोठ्या प्रमाणावर असतो. या लोकांच्या सुरक्षेचा विचारही केला गेला आहे.

Leave a Comment