कोरोनाच्या संशयित व्यक्तीशी संपर्कात आल्यास घरी करा हे काम

सध्या कोरोना व्हायरसच्या थैमानाने जगभरात हाहाकार उडाला आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येताच, इतर निरोगी लोकांनी देखील या व्हायरसची लागण होत आहे. त्यामुळे अशा परिस्थिती विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोनाग्रस्त व्यक्तीसोबत राहणे, त्या व्यक्तीच्या उपकरणांचा वापर करणे अथवा कोरोनाग्रस्त व्यक्ती असलेल्या वातावरणात राहणे अशा गोष्टींमुळे संसर्ग होण्याची भिती अधिक असते.

या आजाराचे लक्षण समोर येण्यास 14 दिवस लागतात. त्यामुळे जर संशय असल्यास व्यक्तीने स्वतःला 14 दिवस घरात एकटे ठेवावे. अशा संशयित व्यक्तीला वेगळे ठेवल्यास त्याला मोकळी हवा येणारे व बाथरूम, शौचालय असणारी खोली द्यावी. कुटुंबातील इतर सदस्यांनी या व्यक्तीपासून 1 मीटर लांब राहावे. संशयित व्यक्तीचा घरातील वावर देखील मर्यादित असावा, तसेच इतरांनी त्या व्यक्तीशी अधिक संपर्कात येऊ नये.

जर एखाद्या व्यक्तीला संशय असेल तर ती व्यक्ती स्वतः स्वतःची काळजी घेऊ शकतो. अशा व्यक्तीने वारंवार साबण आणि अल्कोहॉलयुक्त सॅनिटायजरने हात धुवावे. स्वतःची भांडी, टॉवेल, बेड व इतर वस्तूंचा वापर इतरांना करू देऊ नये व प्रत्येक वेळी मास्क परिधान करावा.

घरातील इतर सदस्यांनी देखील कोरोना संशयित व्यक्तीच्या वस्तू साफ करताना विशेष काळजी घेत, हातमोज्यांचा वापर करावा. आजुबाजूच्या सर्व गोष्टी स्वच्छ ठेवाव्यात. अशा संशयित व्यक्तीची कपडे वेगळी धुवावीत. मास्क देखील व्यवस्थित डिस्पोज करावे व पुन्हा वापरू नये.

जर संशयित व्यक्तीमध्ये खोकला, ताप आणि श्वास घेण्याची समस्या आढळल्यास त्वरित 011-23978046 या नंबरवर कॉल करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment