जगभरात एकापेक्षा एक भयंकर युद्ध झाली आहेत. या युद्धांमध्ये हजारो-लाखो लोक मारली गेली आहेत. मात्र ही युद्ध राज्याचा विस्तार अथवा सत्ता काबीज करणे या कारणांमुळे झाली आहेत. मात्र एक युद्ध केवळ एका बादलीसाठी लढले गेले होते व या युद्धात 2 हजारांपेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
हे युद्ध सन 1325 मध्ये झाली आहे. त्या काळी इटलीमध्ये धार्मिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. येथील दोन राज्य बोलोग्रा आणि मोडेनामध्ये नेहमी युद्ध होत असे. बोलोग्रोला ख्रिश्चन धर्मगुरू पोप यांचे समर्थन होते. तर मोडेनाला रोम सम्राटाचे समर्थन होते.

सन 1296 ला या दोन्ही राज्यांमध्ये आधीच युद्ध झाले होते. सांगण्यात येते की रिनाल्डो बोनाकोल्सीच्या शासनकाळात मोडेना खूपच आक्रमक झाले होते. 1325 मध्ये मोडेनाच्या काही सैनिकांनी गुपचूप बोलोग्रामध्ये घुसून एका किल्ल्यातील लाकडाची बादली चोरी केली व हेच दोन्ही राज्यांमधील युद्धाचे कारण ठरले.

सांगण्यात येते की, ही बादली हिरे-दागिन्यांनी भरलेली होती. किंमती दागिन्यांनी बादली हरवल्याची माहिती मिळताच बोलोग्राच्या सैनिकांनी मोडेनाला ही बादली परत देण्यास सांगितले. मात्र मोडेनाने नकार दिल्याने बोलोग्राने युद्धाची घोषणा केली.

त्याकाळी बोलोग्राकडे 32 हजारांचे सैन्य होते. तर मोडेनाकडे केवळ 7 हजार सैनिक होते. दोन्ही राज्यांमध्ये तुंबळ युद्ध झाले. आश्चर्य म्हणजे कमी सैनिक असलेल्या मोडेनाचा या युद्धात विजय झाला. या युद्धात दोन हजारांपेक्षा अधिक सैनिक मारले गेले.
या युद्धाला ‘वॉर ऑफ द बकेट’ अथवा ‘वॉर ऑफ द ऑकेट बकेट’ म्हणून देखील ओळखले जाते. ज्या बादलीसाठी युद्ध झाले, त्या बादलीला आजही म्यूझियममध्ये ठेवण्यात आलेले आहे.