या परिस्थितीमध्ये पीएफ खात्यातून काढू शकता पैसे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) नोकरी पुर्ण झाल्यानंतर एका निश्चित वेळेनंतर कर्मचाऱ्याला पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची परवानगी देत असते. यामुळे नोकरी गेलेल्या लोकांची आर्थिक चिंता थोडी दूर होते. सोबतच प्रोफेशन बदलून व्यवसाय सुरू करण्यास देखील मदत मिळते.

मात्र गरज असेल तरच ही रक्कम काढावी. कारण नंतर मोठी एकेरी रक्कम तुमच्या हातात येते. मात्र जर तुम्हाला पीएफ खात्यातील रक्कम काढण्याची गरज भासत असेल, तर त्याआधी त्या संदर्भातील नियम जाणून घ्या.

ईपीएफओच्या नियमांनुसार नोकरी गेल्यानंतर खातेधारक खात्यातून 75 टक्के रक्कम काढू शकतो. यासाठी नोकरी गेल्याचे कागदपत्र सादर करावे लागत नाही. कारण खात्यात रक्कम जमा होत नसल्याने, याचे संकेत समजले जातात.

जर सलग दोन महिने नोकरी न मिळाल्यास तुम्ही पीएफ खात्यातून सर्व रक्कम काढू शकता व खाते बंद करू शकता. मात्र जर एखादी महिला लग्नासाठी नोकरी सोडत असेल तर तिला रक्कम काढण्यासाठी 2 महिने वाट पाहण्याची गरज नाही. जर तुमचे वय 58 वर्ष अथवा त्या पेक्षा अधिक असेल तर तुम्ही कधीही पीएफ खात्यातील रक्कम काढू शकता.

कर्मचारी स्वतःच्या, पती/पत्नी, मुले आणि पालकांच्या उपचारासाठी कोणत्याही वेळी व्याजासह स्वतःची जमा केलेली रक्कम अथवा सहा महिन्याचे मासिक वेतन (दोन्हीं पैकी जे कमी असेल ते) काढू शकतात. यासाठी कोणताही लॉक इन पीरियड नाही.

3 वर्षांच्या सर्व्हिसनंतर कर्मचारी गृहकर्ज भरण्यासाठी पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकतो. मात्र यासाठी घर हे खातेधारकाच्या नावावर असणे गरजेचे आहे.

7 वर्षांच्या सर्व्हिसनंतर कर्मचारी स्वतःच्या, भाऊ-बहिण अथवा मुलांच्या नोकरीसाठी व्याजासह स्वतः तर्फे भरण्यात आलेल्या रक्कमेच्या 40 टक्के रक्कम काढू शकतात.

Leave a Comment