ही ट्रिक वापरून एका फोनमध्ये वापरा दोन व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट

सध्या स्मार्टफोनवर एकाच नंबरने एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट वापरता येते. मात्र काही ट्रिक्स वापरून तुम्ही सहज एका मोबाईलवर दोन नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट वापरू शकता. सोबतच तुम्ही दोन्ही नंबरवरून चॅटिंग करू शकता.

सध्या प्रत्येक स्मार्टफोन ड्युअल सिम फीचरसोबत येतो. या फीचरच्या मदतीने युजर्स एका फोनवर दोन नंबरने व्हॉट्सअ‍ॅप चालवू शकतात. सॅमसंग आणि ह्युवाईचे अनेक डिव्हाईस असे आहेत, ज्यात ड्युअल मोड फीचर मिळते. या फीचरच्या मदतीने युजर्स दोन वेगवेगळ्या नंबरने व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट चालवू शकतात.

ड्युअल फीचर अ‍ॅपचा वापर करण्यासाठी युजर्सला सर्वात प्रथम मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन ड्युअल अ‍ॅप्स सेटिंग्सचा पर्याय सुरू करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपचे डुप्लिकेट बनवावे लागेल. व्हॉट्सअ‍ॅप निवडल्यानंतर फोनच्या होम स्क्रिनवर जावे व अ‍ॅप लाँचरवर दुसऱ्या व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक करा. यात युजर्स दुसऱ्या नंबरने अकाउंट सुरू करू शकतात.

गुगल प्ले स्टोरवर देखील व्हॉट्सअ‍ॅपचे वेगवेगळे अकाउंट बनविण्यासाठी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यासाठी युजर्सला पॅरेलल स्पेस, अ‍ॅप क्लोनर, मल्टीपल अकाउंट्स, मल्टी ड्युअल स्पेस आणि सुपर क्लोन प्रो अ‍ॅपला डाउनलोड करावे लागेल.

Leave a Comment