कोरोना : या देशात मिळणार 60 दिवस मोफत वाय-फाय

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. याचा फटका अमेरिकेला देखील बसला आहे. आता या पार्श्वभुमीवर अमेरिकेतील इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर कॉमकास्टने 60 दिवस फ्री वाय-फाय देण्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे लोकांना एकमेंकाशी संपर्कात राहण्यास मदत होईल.

कॉमकास्टनुसार, मोफत वाय-फाय संपुर्ण देशात वाय-फाय हॉटस्पॉटद्वारे उपलब्ध करण्यात येईल.

यात सर्वात प्रथम हॉटस्पॉटवर ‘xfinitywifi’ ला निवडावे लागेल. युजरला हॉटस्पॉटमध्ये वाय-फायची नावे येतील. यानंतर Xfinity Internet ग्राहक यूजरनेम आणि पासवर्ड टाकताच आपोआप हॉटस्पॉटशी कनेक्ट होतील. कॉमकास्टने वॉशिंग्टनमध्ये नॉन कस्टमरसाठी 65,000 सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट लावण्यात आले आहे.

सध्या कंपनीच्या या डाटा प्लॅनवर कोणतीही लिमिट नाही. व्हायरसमुळे घरून काम आणि अभ्यास करणाऱ्यांसाठी ग्राहकांना मोफत डाटा देत आहे.

Leave a Comment