सोशल मीडियाचा अधिक वापर तुम्हाला पाडू शकतो आजारी

स्मार्टफोनचा वापर करणारे सोशल मीडियाचा वापर न करणे शक्यच नाही. लोक फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तासंतास घालवतात. मात्र यामुळे बहुमुल्य वेळ तर वाया जातोच, सोबत या प्लॅटफॉर्मचा वापर आजारी देखील पाडू शकतो.

कॉम्प्युटर इन ह्युमन बिहेव्हियर नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, जर तुम्हाला आनंदी आणि निरोगी राहायचे असेल तर फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणे बंद करावे लागेल. जर तुम्ही सोशल मीडियाशिवाय राहू शकत नसाल तर तुम्ही जास्तीत जास्त 25 मिनिटे या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता.

यासाठी संशोधकांनी दररोज 1 तासांपेक्षा अधिक वेळ सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या 286 लोकांचा अभ्यास केला.

सोशल मीडिया वापरकर्त्यांवर अनेकदा संशोधन करण्यात आलेले आहे. या प्लॅटफॉर्ममुळे नकारात्मक भावना निर्माण होते, हे सिद्ध झालेले नाही. मात्र या प्लॅटफॉर्मवरील युजर्स स्वतःला नेहमी सुंदर दाखविण्या संदर्भात चिंतेत असतात. प्रत्येकजण या प्लॅटफॉर्मवर स्वतःला चांगले दाखविण्याचा प्रयत्न करत असतो व सेलिब्रेटींशी स्वतःची तुलना करतो. यामुळे एक नकारात्मक भावना निर्माण होते.

Leave a Comment