कोरोना : जागतिक नेते आता स्विकारत आहेत भारतीय संस्कृती

कोरोना व्हायरसची भितीने जगभरात लोक एकमेंकाशी हात मिळवण्यास घाबरत आहेत. हा व्हायरस एकमेंकाच्या संपर्कात आल्याने पसरत आहे. त्यामुळे जगभरातील नेते मंडळी देखील एकमेंकाशी हात मिळवण्याऐवजी भारतीय संस्कृतीप्रमाणे नमस्कार करत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रपतींपासून ते फ्रान्सचे राष्ट्रपती देखील नमस्कार करत आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आयर्लंडचे राष्ट्रपती लियो वराडकर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हात मिळवण्या ऐवजी एकमेकांना अभिवादन केले.

Image Credited – Amarujala

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स 11 मार्चला लंडन पॅलेडियम येथे आयोजित प्रिन्स ट्रस्ट पुरस्कारा वेळी लोकांना नमस्कार करताना दिसले.

Image Credited – Amarujala

जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल आणि पोर्तुगलचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी मुलाखती दरम्यान नमस्कार करताना फोटो काढले.

Image Credited – Amarujala

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी स्पेनचे किंग फेलिप यांचे स्वागत नमस्कार करून केले.

Image Credited – Amarujala

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशाला संबोधित करताना लोकांना आवाहन केले की एकमेंकाना अभिवादन करण्याची सवय लावावी. या आधी त्यांनी नागरिकांना भारतीय संस्कृती स्विकारत नमस्ते करण्यास सांगितले.

Leave a Comment