कोरोना : एटीएमपासून ते मोबाईल वापरताना अशी घ्या काळजी

कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा परिस्थितीमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. याशिवाय दररोजच्या जीवनात लागणाऱ्या सार्वजनिक गोष्टींपासून देखील लांब राहणे गरजेचे आहे. एटीएमपासून ते कॅबमध्ये प्रवास करण्यापर्यंत विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Image Credited – Amarujala

एटीएम –

पैसे काढण्यासाठी वारंवार एटीएममध्ये जाऊ नये. कारण मशीनच्या बटन आणि स्क्रीनला स्पर्श केल्याने धोका अधिक वाढतो. नोटांना देखील जास्त स्पर्श करणे टाळावे. त्यापासून देखील संसर्ग होऊ शकतो.

Image Credited – Amarujala

कियोस्क मशीन –

विमानतळावर प्रवाशांना बोर्डिंग पास काढण्यासाठी सोपे जावे म्हणून कियोस्क मशीन लावण्यात आली होती. एटीएमप्रमाणेच कियोस्कच्या बटन व स्क्रीनला जास्त स्पर्श करू नये. कियोस्क मशीनमधून बोर्डिंग पास न काढता. घर अथवा ऑफिसमधून बोर्डिंग पास काढावा. कियोस्कमधून बोर्डिंग पास काढला तरी देखील सेनेटायजर अथवा साबणाने हात धुवावे.

Image Credited – Amarujala

मोबाईल आणि लॅपटॉप –

मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर करताना देखील सावधगिरी बाळगावी. मोबाईलच्या स्क्रीनला स्वच्छ ठेवा. सोबतच लॅपटॉप वापरण्याआधी कीबोर्डला स्वच्छ करा. लॅपटॉपवर काम करताना हातांनी नाक आणि चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू नये.

Image Credited – Amarujala

एस्केलेटर, बस आणि मेट्रो प्रवास –

मेट्रो स्टेशनवरील एस्केलेटरचा वापर करताना काळ्या रंगाच्या स्ट्रिपला पकडल्यानंतर त्याच हातांनी चेहऱ्याला स्पर्श करू नये. मेट्रो आणि बसमध्ये प्रवास करताना कमीत कमी गोष्टींना स्पर्श करा व त्यानंतर सॅनिटायजरने हात स्वच्छ करा.

Image Credited – Amarujala

कॅब –

कॅबमध्ये बसल्यानंतर गाडीच्या खिडक्या उघडाव्या व काळी वेळ गाडी चालल्यानंतरच बंद कराव्यात.  गाडीचा एसी देखील त्वरित सुरू करू नये. प्रवास केल्यानंतर स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

Leave a Comment