कोरोना : सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमागील सत्य

कोरोना व्हायरसचा भारतातील प्रसार वाढत असून, त्यासोबत सोशल मीडियावर अनेक अफवा देखील पसरत आहे. व्हायरसच्या भितीने लोक या अफवांवर विश्वास देखील ठेवतात व त्याची अंमलबजावणी करतात. मात्र कधीकधी या अफवांवर विश्वास ठेवणे घातक ठरू शकते. अशाच काही अफवांचे सत्य जाणून घेऊया.

अल्कोहॉल आणि क्लोरिन – 

शरीरावर अल्कोहॉल आणि क्लोरिन शिंपडल्याने कोरोना व्हायरस नष्ट होतो, असा दावा करण्यात येत आहे. मात्र हे असत्य आहे. कोरोना व्हायरस शरीराच्या आत असल्याने शरीरावर लेप अथवा अल्कोहॉल शिंपडल्याने त्याचा परिणाम कसा होईल ? हे असे करणे धोकादायक ठरू शकते.

पाणी –

खूप पाणी प्या व व्हायरसवर मात करा, असेही काही संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निरोगी आरोग्यासाठी गरजेचे पाणी पिणे आवश्यक आहे, यात काहीच चुकीचे नाही. मात्र खूप पाणी पिणे, अथवा अल्कॉल आणि माउथवॉशचा गुळणा करणे, या गोष्टी व्हायरसला रोखतात हे अद्याप सिद्ध झालेले  नाही.

10 सेंकद श्वास – 

सांगण्यात येत आहे की श्वास 10 सेंकद रोखण्यास सक्षम असाल व यावेळी खोकला अथवा कोणतीही समस्या न आल्यास, तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, असे सिद्ध होते. मात्र हे खोटे आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला आहे की नाही, हे केवळ तपासणी केंद्रातच समजू शकते.

गरम पाण्याने अंघोळ आणि लसूण –

गरम पाण्याने अंघोळ केल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो, असे काहीजण सांगत आहेत. मात्र हे पुर्णपणे खोटे आहे. याशिवाय लसूणचे सेवन देखील व्हायरसला दूर ठेवते असे सांगितले जात आहे. मात्र लसूणमध्ये औषधीय गुण असले तरी कोरोनाशी लढण्यास फायदेशीर आहे की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही.

Leave a Comment