कोरोना; फेसबुकने जाहिर केली दोन कोटी अमेरिकन डॉलर्सची मदत


सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आतापर्यंत हजारो लोकांना ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान फेसबूकने या घातक व्हायरसशी दोन हात करण्यासाठी एक नवा निर्णय घेतला आहे. जगभरातील लोकांच्या संरक्षणासाठी फेसबुक तब्बल दोन कोटी अमेरिकी डॉलर्स देणार आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. सध्या कोरोनामुळे संपूर्ण जग त्रस्त असून या व्हायरसमुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे या व्हायरसशी दोन करण्यासाठी फेसबुक दोन कोटी अमेरिकी डॉलर्स (१४७ कोटी ९१ लाख रुपये) देणार आहे. जागतिक आरोग्य संस्थेकडे फेसबुक हे पैसे सोपवणार आहे. कोरोना प्रतिबंधक औषधे तयार करण्यासाठी या पैशांचा वापर केला जाईल, असे झुकेरबर्ग या मुलाखतीत सांगितले आहे.

Leave a Comment