दरदिवशी 7 रुपये जमा करून महिन्याला मिळवा एवढी पेंशन

निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला एक निश्चित स्वरूपात पेंशनची रक्कम मिळावी, असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या अशा लोकांसाठी सरकार अटल पेंशन योजना फायदेशीर ठरू शकते. या योजनेचे संचालन पेंशन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे केले जाते.

ही योजना 18 ते 40 वयोगटातील लोकांसाठी आहे. या योजनेंतर्गत तुम्ही दर महिन्याला पेंशन स्वरूपात 1 ते 5 हजार रुपये मिळवू शकता.

या योजनेचा प्रिमियम (हफ्ता) हे निश्चित करतो की निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेंशन हवी आहे व योजनेत सहभागी होताना तुमचे वय किती होते. या योजनेचा प्रिमियम मासिक, तिमाही आणि सहामाही असतो.

जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी झाला तर वयाच्या 60 वर्षांनतर तुम्हाला महिन्याला 1 हजार रुपये पेंशनसाठी दर महिन्याला 42 रुपये हफ्ता भरावा लागेल. 5 हजार रुपये पेंशनसाठी तुम्हाला दर महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील.

जर तुम्ही तुमचे वय 40 असेल तर 1 हजार रुपये पेंशनसाठी तुम्हाला महिन्याला 291 रुपये आणि 5 हजार रुपये पेंशनसाठी महिन्याला 1,454 रुपये भरावे लागतील. या काळात जर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 8.5 लाख रुपये पेंशन मिळेल.

3 हजार रुपये गॅरेंडेट रिटर्नसाठी हफ्त्याची रक्कम 126 रुपये ते 792 रुपये असेल. या अंतर्गत व्यक्तीच्या मृत्यूनंतर नॉमिनीला 5.1 लाख रुपये एकेरी रक्कम दिली जाईल. 4 हजार रुपये पेंशनसाठी 18 ते 39 वयोगटातील व्यक्तींसाठी 168 रुपये ते 1,054 रुपये मासिक हफ्ता असू शकतो. तसेच, व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 6.8 लाख रुपये मिळतील.

Leave a Comment