या कॉस्मेटिक ब्युटी थेरपीज् च्या मदतीने हटवा चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणा


चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणा कमी करण्यासाठी अनेक ब्युटी ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. या ट्रीटमेंट करून घेतल्यानंतर चेहरा काही काळापुरता ताजातवाना, तरुण दिसूही लागतो. पण काही काळानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या परत दिसू लागतात. त्यामुळे अश्या ब्युटी ट्रीटमेंट परत परत घ्याव्या लागतात. पण चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा डाग कायमस्वरूपी घालविण्यासाठी काही कॉस्मेटिक थेरपीज चा विचार करता येईल.

लेझर आणि आयपीएल थेरपी, म्हणजेच इंटेन्स पल्स लाईट थेरपी, व्यक्तीच्या चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स , म्हणजेच वाढते वय, प्रदूषण, खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी, असंतुलित आहार, मानसिक तणाव, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी कारणांमुळे चेहऱ्यावर उद्भविलेले भुरकट काळपट रंगाचे डाग घालाविण्यासाठी उपयुक्त थेरपी आहे. या थेरपीमुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि डार्क स्पॉट्स नाहीसे होऊन त्वचा नितळ दिसू लागते. ही थेरपी अतिशय सोयीची, जलद आणि सुरक्षित आहे. या थेरपीचे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाहीत.

लायपोक्राफ्ट ही थेरपी त्वचेवरील जुन्या जखमांचे वण, किंवा स्ट्रेच मार्क्स नाहीसे करण्यासाठी उपयुक्त आहे. त्वचा नैसर्गिकरीत्या तरुण आणि सुंदर दिसावी या करिता ही थेरपी ‘ adipose derived stem cells ‘ चा वापर करून केली जाते. तसेच त्वचा नितळ आणि सुंदर दिसावी, वाढत्या वयाच्या खुणा त्वचेवरून नाहीश्या व्हाव्यात या करिता सेल थेरपी दिली जाते. स्टेमसेल्सच्या मदतीने ‘टोटल बॉडी रीज्युव्हीनेशन’ करून देणारी ही थेरपी अनेक नामांकित कॉस्मेटिक क्लिनिक्स मध्ये उपलब्ध आहे. ही थेरपी तज्ञांकडून करवून घेणे आवश्यक आहे.

बायो आयडेंटीकल हार्मोन थेरपी सध्या खूपच लोकप्रिय ठरत आहे. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे त्वचेवर सुरकुत्या येऊ लागल्या असल्यास ह्या थेरपीचा उपयोग होतो. यामध्ये शरीरामध्ये ज्या हार्मोन्सचे कार्य सुरळीत होत नसेल, ते पूर्ववत करण्यासाठी ही थेरपी दिली जाते. ह्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या नाहीश्या होऊन त्वचा तरुण दिसू लागते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment