कोरोना : 25 हजार साबण वापरून विद्यार्थींनी दिला हात धुण्याचा संदेश

देशात सध्या कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 90 च्या पुढे गेली आहे. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने या व्हायरसपासून बचावासाठी जागृक करण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न तामिळनाडूच्या कोलाथूर येथील एव्हरविन विद्याश्रम शाळेतील 6 ते 9 च्या वर्गातील 1000 विद्यार्थ्यांनी केला आहे.

या विद्यार्थ्यांनी कोरोना व्हायरसपासून वाचण्याचा संदेश देण्यासाठी 25 हजार साबणांचा वापर करून चित्र बनवले आहे. या चित्रामध्ये विद्यार्थ्यांनी हात धुण्याचा संदेश दिला. नेटकरी देखील या चित्राचे कौतूक करत आहेत.

10 हजार वर्ग फुटात काढण्यात आलेला या चित्राचा उद्देश हात धुवा आणि दीर्घ आयुष्य जगा हा संदेश देणे आहे. या चित्राद्वारे लोकांना जागृक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Leave a Comment