दोन वडिलांच्या या मुलीचा पॉकेटमनी आहे तुमच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त


ब्रिटनमधील सॅफरोन ड्रेव्हिट आणि तिचे जुळे भाऊ ही पहिली अशी मुले आहेत ज्यांचे दोन पिता आहेत. होय! हे खरे आहे या मुलांचे वडील दोन असून हे दोन्ही पिता अब्जाधीश समलैंगिक आहेत. सरोगसी तंत्राद्वारे सॅफरोन आणि तिच्या भावांचा जन्म झाला आहे. नुकताच सॅफरोनने तिचा १८ वा वाढदिवस साजरा केला आहे. सॅफरोनला वयाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर जे गिफ्ट मिळाले आहे तेही आश्चर्यचकित करणारे आहे.

१८व्या वाढदिवसानिमित्त सॅफरोनला अशी काही भेट मिळाली आहे, ज्याचा विचारही सर्वसामान्य करु शकत नाही. या अल्पवयीन मुलीला सफेद रंगाची लँड रोव्हर कार आणि कोट्यावधी रुपये किंमतीचे जगातील सर्वात महागडे कपडे, शूज, अॅक्सेसररीज, हिरे-माणिक-मोती असे सर्वकाही भेट म्हणूने मिळाले आहे. तिला गेल्या काही वाढदिवसांपासून आतापर्यंत जवळपास १० कोटींचे गिफ्ट मिळाले आहेत.

मित्रांसोबत फिरण्यासाठी, पार्टी करण्यासाठी सॅफरोनला दर महिन्याला जो पॉकेटमनी मिळतो, तो सर्वसमान्य व्यक्तीच्या वार्षिक पगारापेक्षाही जास्त आहे. दर महिन्याला सॅफरोनला ५००० पाऊंड म्हणजे जवळपास ४.५ लाख रुपये पॉकेटमनी म्हणून मिळतात. त्याचबरोबर तिच्या बोटांमध्ये ३.५ कोटी रुपयांची अंगठी आहे. यावरुनच तिच्या दागिन्यांचा आणि लक्झरी लाइफचा अंदाज तुम्ही लावू शकता.

सॅफरोन आपला वाढदिवस आपल्या जुळ्या भावंडांसोबत साजरा करते. सॅफरोन प्रमाणेच तिच्या जुळ्या भावांनाही दोन्ही वडिलांकडून असेच गिफ्ट मिळत असतात. तिचा भाऊ एस्पन याला बर्थडेला काळ्या रंगाची रेंज रोव्हर कार गिफ्ट मिळाली होती. सॅफरोनच्या समलैंगिक पिता टोनी आणि बैरी यांच्याकडे ३५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. दोघांचे अनेक बिझनेस आहेत. त्यासोबतच एक प्रसिद्ध मेडिकल रिसर्च कंपनी आहे.

Leave a Comment