अँड्राईड व्हायरसच्या निशाण्यावर हजारो फेसबुक अकाउंट्स

हॅकर्स अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला निशाणा बनवत आले आहेत. हॅकर्सला याद्वारे खाजगी माहिती तर मिळतेच, सोबतच व्हायरस पसरवणे देखील सोपे जाते. एक नवीन अँड्राईड ट्रोजन हॉर्स व्हायरस समोर आला आहे. जो कुकीजद्वारे फेसबुक अकाउंट्सची माहिती चोरी करत आहे.

या व्हायरसचे नाव कुकी थीफ (CookieThief) असून, याचा शोध सायबर सिक्युरिटी आणि अँटी व्हायरस बनवणारी कंपनी Kaspersky Labs ने लावला आहे.

हा व्हायरस कुकीजद्वारे फेसबुक अकाउंट्सची खाजगी माहिती चोरी करत आहे. कुकीजचे मुख्य काम ऑनलाईन जाहिरातींचे असते. रिपोर्टनुसार, या व्हायरसने आतापर्यंत 1 हजार डिव्हाईसला निशाणा बनवले आहे. हे व्हायरस अँड्राईड डिव्हाईसमध्ये एक रूट फाइल इंस्टॉल करते. फेसबुक कुकीजद्वारे व्हायरस फेसबुक अकाउंट लॉग इन करतो व इंफेक्टेड लिंक पसरवण्याचे काम करतो. हा व्हायरस डिव्हाईसमध्ये कसा घुसतो, याची अद्याप माहिती मिळाले नाही.

त्यामुळे अँटी व्हायरस आणि मॅलवेअर रिमूव्हरद्वारे सिस्टम स्कॅन केल्यानंतरच काम करा.

Leave a Comment