बिल गेट्स करणार आता फक्त समाजसेवा,मायक्रोसॉफ्टला रामराम

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती मायक्रोसॉफ्टने दिली आहे. लोककल्याणासाठी वेळ मिळावा, यासाठी गेट्स यांनी हा निर्णय घेतला आहे. पदाचा राजीनामा दिला असला तरी गेट्स कंपनीचे तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत असतील.

64 वर्षीय गेट्स यांनी एक दशकांपुर्वीच कंपनीच्या दैनंदिन कामकाजात लक्ष देणे बंद करत, पत्नी मिलिंडासह फाउंडेशनची स्थापना केली होती.

1975 साली बिल गेट्स आणि पॉल एलेन यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. गेट्स वर्ष 2014 पर्यंत कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे चेअरमन होते. त्यांनी 2000 साली कंपनीचे सीईओपद सोडत स्टिव्ह बॅलमेर यांच्याकडे पदभार सोपवला होता. त्यानंतर 2014 साली सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ म्हणून कार्यभार स्विकारला होता.

पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गेट्स आपल्या फाउंडेशनमार्फत लोककल्याणाच्या कामास अधिक वेळ देणार आहेत.

गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणाले की, गेली अनेक वर्ष बिल यांच्यासोबत काम करणे आणि त्यांच्याकडून शिकणे हा खरचं एक सन्मान होता.

 

Leave a Comment