जिओचे IUC मिनिट संपले ? हे आहेत स्वस्तातले टॉप-अप प्लॅन

सध्या जिओच्या सर्व प्री-पेड प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी आययूसी मिनिट मिळतात. मात्र हे मिनिट अनेकदा कालावधीच्या आधीच संपतात व नंतर इतर नेटवर्कवर कॉल करता येत नाही. आज असेच स्वस्तःले प्लॅन तुम्हाला सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही आययूसी मिनिटे संपल्यानंतरही त्यांच्या रिचार्जद्वारे कोणत्याही नेटवर्कवर कॉल करू शकता.

10 रुपयांचा टॉप-अप रिचार्ज –

या प्लॅनमध्ये युजर्सला 7.47 रुपयांचा टॉकटाईम आणि 124 आययूसी मिनिट मिळतात. सोबतच कंपनी 1 जीबी डाटा देखील देते.

20 रुपयांचा टॉप-अप रिचार्ज –

या प्लॅनमध्ये युजर्सला 14.95 रुपयांचा टॉकटाईम आणि 249 आययूसी मिनिट मिळतील. सोबतच कंपनी 2 जीबी डाटा देखील देते.

50 रुपयांचा टॉप-अप रिचार्ज –

या प्लॅनमध्ये युजर्सला 39.37 रुपयांचा टॉकटाईम आणि 656 आययूसी मिनिट मिळतील. सोबतच कंपनी 5 जीबी डाटा देखील देते.

100 रुपयांचा टॉप-अप रिचार्ज –

या प्लॅनमध्ये युजर्सला 81.75 रुपयांचा टॉकटाईम आणि 1,362 आययूसी मिनिट मिळतात. याशिवाय युजर्सला 10 जीबी डाटा देखील मिळतो.

Leave a Comment