गॅस सिलेंडरसोबत मिळतो 6 लाखांचा विमा, असा करा दावा

सध्या सरकारतर्फे घरगुती सिलेंडर सर्वांना मिळावा यासाठी योजना चालवली जात आहे. मात्र यासोबतच घरगुती गॅस सिलेंडरसोबत मोफत विमा देखील मिळतो, हे खूप कमी जणांना माहिती आहे. जर तुमच्या घरात गॅसमुळे अपघात झाला तर तुम्ही कंपनीकडे विम्यासाठी क्लेम करू शकता. हा विमा कनेक्शन जोडल्यापासून सुरू होतो.

तेल कंपन्या आपल्याकडून 6 लाख रुपयांपर्यंतचा कव्हर देतात. जर तुमच्या घरात गॅसमुळे एखादी घटना घडली तर तुम्ही गॅस वितरकाला याची माहिती देऊ शकता. त्यानंतर वितरक विमा कंपनीला याबाबत माहिती देईल व पुढील प्रक्रिया केली जाईल.

जर एखाद्या कारणामुळे एलपीजी सिलेंडरच्या स्फोटात व्यक्तीचा मृत्यू झाल्या गॅस कंपनी प्रती व्यक्ती 6 लाख रुपये भरपाई देते. व्यक्ती स्फोटात जख्मी झाल्यास 2 लाखांपर्यंतचा विमा मिळतो. सोबत स्फोटात संपत्तीचे नुकसान झाले असल्यास 2 लाखांपर्यंतची भरपाई मिळते.

जर गॅस सिलेंडरमुळे घटना घडली असल्यास, सर्वात प्रथम स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवा. यानंतर गॅस वितरकाला एफआयआरच्या कॉपीसह घटनेची माहिती द्या. वितरक या संबंधी रिपोर्ट कंपनीला पोहचवतो.

तपासणीसाठी कंपनीकडून विम्याची एक टिम येईल व हीच टिम क्लेमची रक्कम निश्चित करेल. क्लेम केलेली रक्कम कंपनीतर्फे देण्यात येईल. कंपनी वितरकामार्फत ही रक्कम ग्राहक अथवा कुटुंबाला देईल.

Leave a Comment